मित्रांनो येत्या काही दिवसात भारतात मान्सून (Mansoon) दाखल होणार आहे. खरं पाहता यामुळे शेतकरी समवेतच (Farmer) सामान्य नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी मान्सून काळात वीज कोसळून दरवर्षी मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असते शिवाय पशुधनाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होत असते.
यामुळे भारतीय हवामान विभागाने यावर अंकुश घालण्यासाठी एका भन्नाट ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. दामिनी नामक या ॲप्लिकेशनच्या मदतीने वीज कोसळण्याच्या पंधरा मिनिट अगोदर मोबाईल वर सूचना मिळणार आहे.
यामुळे निश्चितच वीज कोसळल्याने होऊ घातलेले नुकसान शिवाय जीवितहानी टळण्यास मदत होणार असल्याचा दावा केला जात आहे.
अँप्लिकेशन कसं काम करणार
मित्रानो नेहमीच पावसाळ्यात वीज पडून जीवित हानी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घटत असतात.
यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे देखील मोठे नुकसान होत असते. हीच बाब लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने एका ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे.
या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या भागात वीज कोसळणार आहे त्याची स्थलदर्शक माहिती पंधरा मिनिटे अगोदर मोबाईलवर एप्लीकेशन वापरकर्त्याला सूचनेच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला सुरक्षित जागी जाता येणार असून शेतकरी बांधवांना देखील यामुळे आपले पशुधन सुरक्षित जागी ठेवता येणे शक्य होणार आहे.
निश्चितच या एप्लीकेशन मुळे एप्लीकेशन वापरकर्त्याला जी सूचना दिली जाते त्यामुळे जीवित हानी टाळता येणे सहज शक्य होणार आहे.
Published on: 14 May 2022, 07:00 IST