News

सध्या राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी यावर टीका केली. राज्य सरकारने वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Updated on 30 January, 2022 6:00 PM IST

सध्या राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी यावर टीका केली. राज्य सरकारने वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. यावर अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. असे असताना आता एक वेगळीच मागणी एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने कार्टुनच्या माध्यमातून केली जात आहे. ज्यात त्याने कांदा हा आयुर्वेदिक असून त्याची पण वाईन करा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यालासुध्दा न्याय द्या, अशी मागणी केली आहे.

त्यांनी कार्टुनच्या माध्यमातून राज्याच्या कृषीमंत्र्याकडे कवितेच्या माध्यमातून ही इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे सध्या याची चांगलीच चर्चा रंगली आहे. नाशिकच्या सटाणा येथील शेतकरी आणि कार्टुनिस्ट संजय मोरे यांनी ही कविता केली आहे. ज्यात त्यांनी कांद्यापासून वाईन तयार केली, तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, असे म्हटले आहे. कांदा हा शेतकऱ्यांना दरवर्षी एकदातरी रडवतोच. अनेकदा याचे भाव कोसळतात, यामुळे शेतकरी तोट्यात जातो, अनेकदा हा कांदा आपल्या रानात त्याला फेकून द्यावा लागतो, यामुळे सध्या ही कविता चांगली व्हायरल झाली आहे.

द्राक्ष अनेकवेळा निर्यातक्षम असतांना अनेकवेळा अडचणीच निर्माण होऊन त्याचे नुकसान होते, तोच न्याय कांद्याला पण मिळावा आणि कांद्याची पण वाईन तयार व्हावी, अशी मागणी या शेतकऱ्याने कवितेच्या माध्यमातून केल्याने सध्या हे कार्टुन आणि कविता सगळीकडे व्हायरल होत आहे. यामुळे हा शेतकरी चांगलाच चर्चेत आला आहे. कांद्यामुळे दरवर्षी अनेक प्रश्न निर्माण होत असतात. राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यामुळे त्यांना दरवषी भाव मिळेल याची कसलीही गॅरंटी नसते. राज्यात अनेक फळांचे ज्युस आणि त्यापासून वाईन तयार केली जाते. असे असले तरी त्याला सरकारी मान्यता नाही. केवळ द्राक्षापासून तयार होणाऱ्याच वाईनला पारवानगी आहे.

राज्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. त्यातच वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्षांचे उत्पादनसुध्दा अनेक शेतकरी घेत असतात. मात्र जास्त खप नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी या बागा काढून टाकल्या आहेत. अनेकजण यामुळे कर्जबाजारी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात वाईन तयार करणाऱ्या फॅक्टरीसुध्दा मोठ्या संख्येने आहेत. निफाड तालुक्यातील विंचूर येथे वाईन पार्क यासाठी प्रसिद्ध आहे. आता राज्य सरकरने हा निर्णय घेतला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा होणार का? हे येणाऱ्या काळातच समजणार आहे. तसे झाले तरच खऱ्या अर्थाने हा निर्णय फायद्याचा ठरला असे म्हणता येईल.

English Summary: What do you say Will wine be made from onions now? Discussions abound ..
Published on: 30 January 2022, 11:20 IST