News

राज्यातील अनेक जिल्हयात खत टंचाई होत असल्याची बातम्या आपल्या कानावर येत आहेत. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी सूर उमटत आहे, पण चालू खरीप हंगामात आतापर्यंत सुमारे २९ लाख टन खतांची विक्री झाली. गेल्या वर्षी संपुर्ण हंगामात ३३ लाख टन खतांचा वापर झाला होता, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ९ लाख टन युरियाचा पुरवठा झाला आहे. दरम्यान अद्याप अडीच लाख टन युरिया साठा उपलब्ध आहे.

Updated on 18 July, 2020 7:04 PM IST


राज्यातील अनेक जिल्हयात खत टंचाई होत असल्याची बातम्या आपल्या कानावर येत आहेत. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी सूर उमटत आहे, पण चालू खरीप हंगामात आतापर्यंत सुमारे २९ लाख टन  खतांची विक्री झाली. गेल्या वर्षी संपुर्ण हंगामात ३३ लाख टन खतांचा वापर झाला होता, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ९ लाख टन युरियाचा पुरवठा झाला आहे. दरम्यान अद्याप  अडीच लाख टन युरिया साठा उपलब्ध आहे. तरीसुद्धा टंचाई भासवून शेतकऱ्यांना अधिक दरात युरिया खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांची गरज ओळखून सुमारे ४० लाख टन खत पुरवठ्याचे नियोजने कृषी खात्याने केले होते.

त्यानुसार आधीचा शिल्लक सुमारे १९ लाख टन आणि नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेला २४ लाख टन असा एकूण राज्यात सुमारे ४३ लाख टन खतांचा साठा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यापैकी मंगळवार अखेर २९ लाख ६२ हजार टन खतांची विक्री झालेली आहे. तर सुमारे १३ लाख टन खतसाठा शिल्लक असल्याचे कृषी खात्याने स्पष्ट केले आहे. यात सुमारे अडीच लाख टन युरियाचा साठा शिल्लक आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना खतांच्या टंचाईला समोरे जावे लागत आहे. मागणी केलेले खते मिळत नाहीत, त्याऐवजी दुसरे खते जास्त दराने घ्यावी लागत आहे. अनेक भागात शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा आजही जाणवत आहे. इतरही अनेक खते मागणीनुसार मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात.

विक्रेते व कंपन्यांकडून युरियासोबत डीएपी किंवा अन्य खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे.  तर काही ठिकाणी कृषी सेवा केंद्रचालक उपलब्ध असलेल्या खंतांचीही टंचाई भासवून शेतकऱ्यांना अधिक दरात युरिया खरेदी करण्यास भाग पाडत आहे. डीएपीचा सध्याचा दर १२०० ते १२५०० रुपये आहे, पण १३०० ते १४०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. युरियाचा दर २६७  रुपये आहे, पण त्यालाही ३५० ते ४०० रुपयांपर्यंत दर आकराला जात आहे. दरम्यान राज्यात खताची टंचाई नाही, मात्र मागणीत वाढ झाली आहे. कोविडमुळे शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून वैयक्तिक पातळीवर खतांचा जादा साठा करुन ठेवला आहे. शिवाय मॉन्सून चांगला झाल्यामुळे खथ वापर आणि मागणीत उसळी दिसते आहे, असे कृषी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगत येत आहे.

English Summary: What do you say! Two and a half lakh tonnes of urea balance in the state
Published on: 18 July 2020, 07:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)