News

केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांसाठी विशेषता समाजातील दुर्बल घटकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करीत असते. याद्वारे सरकारचा मानस अशा दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावणे हेच असते. केंद्र सरकार दुर्बल घटकातील व्यक्तींसाठी तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवित असते. केंद्र सरकारच्या एका योजनेद्वारे महिलांना सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येतात.

Updated on 26 March, 2022 9:20 PM IST

केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांसाठी विशेषता समाजातील दुर्बल घटकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करीत असते. याद्वारे सरकारचा मानस अशा दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावणे हेच असते. केंद्र सरकार दुर्बल घटकातील व्यक्तींसाठी तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवित असते. केंद्र सरकारच्या एका योजनेद्वारे महिलांना सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येतात.

आज आपण केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, केंद्र सरकार पीएम मातृत्व वंदना योजना या योजने अंतर्गत महिलांना 6000 रुपये प्रदान करत असते. चला तर मग या योजने विषयी जाणून घेऊया.

या महिलांना मिळतात 6 हजार रुपये

केंद्र सरकारने पीएम मातृत्व वंदना योजना ही योजना महिलांसाठी सुरु केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी गर्भवती महिलांना तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक साहाय्य म्हणून सहा हजार रुपये दिले जातात. गर्भवती महिलांचे भरण पोषण व्यवस्थित रित्या व्हावे तसेच येणाऱ्या बालकाचे भरण पोषण व्यवस्थित व्हावे या अनुषंगाने केंद्र सरकारने 2017 साली या योजनेचे अनावरण केले होते. 2017 मध्ये सुरू झालेली ही योजना आजतागायत सुरू आहे. मात्र, या योजनेसाठी गवळण गर्भवती महिलाच अर्ज करु शकता इतर महिला या योजनेसाठी पात्र नसतात.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आई-वडिलांचे आधार कार्ड

आईवडिलांचे ओळखपत्र

बालकाचे जन्म प्रमाणपत्र

बँक पासबुक

जी महिला या योजनेअंतर्गत पात्र असेल अर्थात गर्भवती महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज करताना वर निम्नलिखित कागदपत्रे सादर करणे अपरिहार्य असते.

योजनेचे स्वरूप आहे तरी कसे

मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेअंतर्गत पात्र महिलेस कशा पद्धतीने पैसे दिले जातात. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेद्वारे दिले जाणारे सहा हजार रुपये एकूण तीन टप्प्यात पात्र महिलेच्या खात्यात वर्ग केले जातात.

पहिल्या टप्प्यात या योजनेद्वारे 1,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. दुसऱ्या टप्प्यात या योजनेद्वारे दोन हजार रुपये दिले जातात. तिसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये दिले जातात आणि उर्वरित हजार रुपये बालकाच्या जन्मानंतर पात्र महिलांच्या खात्यावर वर्ग केले जातात. ज्या पात्र महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम मातृत्व वंदना योजनेच्या https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत साइटवर भेट द्यावी लागणार आहे.  

संबंधित बातम्या:-

मराठवाड्याचा पाण्याचा तंटा मिटणार! कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याकडे वळणार- जयंत पाटिल

मोठी बातमी! राजू शेट्टी यांच्याकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकमेव आमदाराची हकालपट्टी

English Summary: What do you say Rs 6,000 is given to women through this scheme
Published on: 26 March 2022, 09:20 IST