वातावरणात सतत बदल झाल्यामुळे पिकांवर काय परिणाम होतो ते आपल्याला द्राक्षेच्या बागेवरूनच समजते. दरवर्षी शेतकरी द्राक्षेची काढणी करून लवकरात लवकर बाजारात कसे पोहचतील या घाईत असतात मात्र यावेळी चित्र वेगळेच दिसत आहे. द्राक्ष बागायतदार द्राक्षे बाजारपेठेत न पाठवता बेदाणा तयार करण्यासाठी शेड वर पाठवत आहेत. वर्षभर या वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना द्राक्षाचे घड पोसता आले नाहीत. सध्याचे हे ढगाळ वातावरण आणि अति थंडीमुळे द्राक्षाच्या बागेवर घडकूज, मणीगळ तसेच डाऊनी सारखे रोग पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्षेच्या मागणीत घट झाल्यामुळे शेतकरी आता द्राक्षे बाजारपेठेत न पोहचवता बेदाणा तयार करण्यासाठी पाठवत आहेत.
बेदाणा निर्मीतीमध्येही अडचणी :-
वातावरणाच्या बदलामुळे द्राक्षचे नुकसान तर झालेच आहे मात्र बेदाणा तयार करण्यासाठी सुद्धा हे वातावरण पोषक नाही. जानेवारी महिना हा बेदाणा तयार करण्यासाठी पोषक मानला जातो मात्र आता या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी बेदाणा तयार करण्यावर भर देत आहेत. बेदाणा तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश ची गरज असते मात्र मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्यामुळे बेदाणा तयार करणे लांबणीवर पडणार आहे. निसर्गामुळे द्राक्षाचे तर नुकसान झालेच आहे मात्र अजूनही बेदाणा निर्मिती साठी पोषक वातावरण नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
वाढलेल्या थंडीमुळे घडकूज :-
द्राक्षाची बाग जोपासण्यासाठी शेतकरी वर्गाने अनेक परिश्रम घेतले आहेत जे की मध्यरात्री कडाकीच्या थंडीत शेतकऱ्यांनी बागेत शेकोट्या पेटवून द्राक्षांना ऊब दिलेली आहे एवढ सर्व काही करून सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात फक्त आणि फक्त नुकसान च ठरले आहे. आता द्राक्षाच्या बागेतून नाही तर बेदाणा मधून तरी चांगल्या प्रकारे उत्पन्न निघेल अशी शेतकऱ्यांची अशा आहे मात्र अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.
सांगली जिल्ह्यात 400 ते 500 शेडवर बेदाण्याची निर्मीती :-
ज्या द्राक्षाची बाजारामध्ये विक्री झाली नाही ते द्राक्षे बेदाणा तयार करण्यासाठी पाठवले जात आहेत जे की यासाठी एक यंत्रणा आहे. सांगली जिल्ह्यात जवळपास ४००-५०० शेड आहे जिथे बेदाणे तयार केले जातात. मात्र यंदा द्राक्षाच्या बागेसाठी पोषक वातावरण नाही तसेच बेदाणा निर्मिती साठी सुद्धा अजून पोषक वातावरण तयार झाले नाही.
Published on: 19 January 2022, 04:48 IST