News

राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणालाही लावता येत नाही. अनेक घडामोडी या राजकारणात होत असतात. देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Updated on 24 February, 2022 10:03 AM IST

राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणालाही लावता येत नाही. अनेक घडामोडी या राजकारणात होत असतात. देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांच्या प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक भाजप आमदाराची प्रचार सभा होती. यावेळी चक्क भाजपच्या उमेदवाराने खुर्चीवर उभे राहून उठा बशा काढत, जनतेची माफी मागितली आहे. माफी मागतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे सध्या याची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

उत्तर प्रदेश मधील सोनभद्रमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान आमदार आणि भाजपचे उमेदवार भूपेश चौबे यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. प्रचारादरम्यानच भूपेश चौबे यांनी खुर्चीवर उभे राहून कान पकडून पाच वर्षात झालेल्या चुकांसाठी जनतेची माफी मागितली आहे. यामुळे आता जनता त्यांना निवडून देणार का हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल. भूपेश चौबे हे सोनभद्रच्या रॉबर्टसगंज मतदारसंघातून आमदार आहेत. भाजपने त्यांना पुन्हा एकदा तिकीट देऊन मैदानात उतरवले आहे. त्यांनी केलेल्या या प्रकारामुळे मात्र आता याचा भाजपला फायदा होणार की तोटा याची देखील चर्चा सुरु आहे.

या प्रचारसभेसाठी भूपेश चौबे यांनी झारखंडचे माजी आरोग्य मंत्री आणि आमदार भानू प्रताप शाही यांना आपल्या प्रचारासाठी बोलावले होते. यावेळी हा सगळं प्रकार घडला. प्रचारासाठी स्टेज उभारून भाषणे सुरू होती. भाजपचे उमेदवार भूपेश चौबे यांनी खुर्चीवर उभे राहून दोन्ही कान पकडून आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी मागायला सुरुवात केली. त्यांना हे करताना पाहून अनेकांनी अडवण्याचा देखील प्रयत्न केला. ते म्हणाले, 2017 च्या निवडणुकीत ज्या प्रकारे तुम्हा सर्व देवभक्त कार्यकर्त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्याचप्रमाणे यावेळीही तुमचे आशीर्वाद द्या. जेणेकरून रॉबर्टसगंज विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलू शकेल.

त्यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या चुकांची माफी मागण्यास सुरुवात केली. भाजपच्या राजवटीत गुंड माफिया तुरुंगात आहेत. मोदी आणि योगींच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि राज्याचा झालेला विकास पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. अशा स्थितीत ते केवळ प्रचाराशिवाय दुसरे काही करू शकत नाहीत, असे ते म्हणाले. यामुळे आता मतदार काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English Summary: What do you say BJP leader picked up, asked for five full
Published on: 24 February 2022, 10:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)