News

शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? फळगळीमुळे संत्रा उत्पादकांना बसला पाचशे कोटींचा फटका

Updated on 27 April, 2022 12:40 PM IST

संत्रा उत्पादकांच्या फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. यातून संत्रा पट्ट्यातील अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचे चिन्हे वर्तवली जात आहेत. या क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबिया बहार घेणाऱ्या संत्रा उत्पादकांचे तब्बल पाचशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले गेले आहे. सध्या संत्रापट्ट्यात आंबिया बहराचे व्यवस्थापन केले जाते.

हा बहार एका विशेष कालावधी दरम्यान घेतला जातो. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत हा बहार घेतला जातो. त्यानंतर ५ जानेवारीपासून पाणी देण्यास सुरुवात केली जाते. जानेवारी अखेरपर्यंत फुलधारणा होते. फुलधारणा झाल्यानंतर फळधारणा सुरू होते. सध्या निंबोळीच्या आकाराची फळे झाडावर आहेत. १५ ऑगस्टपासून या बहरातील फळे परिपक्व होतात व नंतर ते काढणीस येतात व डिसेंबरपर्यंत ती मिळतात.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे असे शेतकरी आंबिया बहार घेतात. आंबिया बहारची उत्पादकता वाढत असल्याने गेल्या दहा वर्षात आंबिया बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. एक लाख हेक्‍टरवर आंबिया बहार घेऊन ४० ते ५० हजार हेक्‍टरवर मृग बहाराचे व्यवस्थापन केले जाते. आंबिया बहरात तब्बल हेक्‍टरी आठ टनांचे उत्पादन होत असते. या वर्षी संत्रा बागांची परिस्थिती चांगली होती. मात्र मार्च महिन्यात उष्णतेची लाट आली. मे महिन्यात विदर्भात ४५ ते ४६ अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात वाढ होत असते.

यंदा हा पारा मार्च महिन्यातच वाढला. जवळजवळ ४० अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात वाढ झाली. उन्हाच्या तीव्र झळा बागांवर गंभीर परिणाम करत आहेत. हे तापमान बागांना सहन न झाल्याने लहान आकाराच्या फळांची गळ होत आहे. तसेच पंजाब, राजस्थान भागात किनो फळ घेणाऱ्या त्पादकांना तापमान वाढीचा मोठा फटका बसला आहे. महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी नुकतीच झालेल्या फळगळतीची आकडेवारी समोर आणली. एक लाख हेक्‍टरवर आंबिया व मृग बहार घेतला जातो .

सरासरी हेक्‍टरी उत्पादकता आठ टन धरल्यास दोन्ही बहरातील एकत्रित आठ लाख टन उत्पादकता राहते. त्याचे जर वर्गीकरण केले तर तीन लाख टन मृगाचे तर पाच लाख टन आंबिया बहराची उत्पादकता आहे. आंबिया बहारातील फळाचे यावर्षी जवळजवळ अडीच लाख टन इतकी फळ गळती झाली आहे. सरासरी दर २० हजार रुपये टन धरले तर पाचशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. बागांना योग्य पाणीपुरवठा गरजेचा आहे. परंतु काही शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे तर दुसरीकडे पाणी असताना विजेची गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे तापमानाची तीव्रता कमी करण्यासाठी शेड नेट सारख्या गोष्टी करणे गरजेचं आहे. शिवाय पाण्याची उपलब्धता देखील गरजेची आहे.

महत्वाच्या बातम्या;
Watermelon : शेतकऱ्यांवर संकटाची मालिका कायम!! टरबूज पिकाला कवडीमोल दर मिळतं असल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत 
मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय! आता होणार नैसर्गिक शेती
मालेगावच्या पठ्ठ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग!! बिया नसलेल्या कलिंगडाची लागवड अन परदेशी पाहुण्यांची बांधावर हजेरी 

English Summary: What do farmers want? Fruits cost orange growers Rs 500 crore
Published on: 27 April 2022, 12:40 IST