News

मुसळधारेमुळे जमिनी देखील खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे शेत पिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक शेतात पाणी साचले आहे. तर जनावरांचे देखील हाल होत आहे.

Updated on 01 September, 2023 5:01 PM IST

परभणी

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र काही भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. पण मराठवाडा विभागातील परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग उडिद, ज्वारी आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.

मुसळधारेमुळे जमिनी देखील खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे शेत पिकांचे नुकसान झाले आहे.

आता जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच पावसामुळे काही भागातील पिकांना दिलासा देखील मिळाला आहे.

तसंच राज्याच्या बहुतांश भागात सध्या पाऊस सुरु आहे. मात्र काही भागात अजून शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. तसंच जोरदार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

English Summary: What crops are damaged in Marathwada due to rain
Published on: 26 July 2023, 01:27 IST