सध्या शेतकऱ्यांना खूपच वाईट दिवस आले आहेत. शेतकऱ्यांच्या भाज्यांना दर नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्यानंतर आता वांग्याच्या दरामध्येही घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. कोल्हापुरात वांग्याला प्रति किलो फक्त 27 पैसे दर मिळाल्याचं समोर आले आहे.
यातून शेतकऱ्याचा वाहतूक खर्च देखील निघाला नसून रात्रंदिवस शेतात राबवून शेतकऱ्याच्या हाती अखेर निराशा पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर देण्यात आला असून शेतकऱ्याला पिकातून वाहतुकीचा खर्च देखील निघालेल नाही.
हा आजपर्यंतचा सर्वात निश्चित दर असून जगदाळे कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात मात्र आज इतका नीचांकी दर त्यांच्या वांगी पिकाला मिळाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या पदरी घोर निराशा पडली आहे. यामुळे शेती करण्याची कशी असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मागणी येईल तिथं कांदा खरेदी करणार, शेतकऱ्यांना लवकरच मोठी मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय
जगदाळे यांनी 237 किलो वांगी त्यांनी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवली होती. तर याची एकूण किंमत ही 592 रुपये देण्यात आली यातून भाडे आणि हमाली भत्ता काढून केवळ एकूण 66 रुपये या शेतकऱ्याला मिळाले आहेत.
बाजारात मात्र हीच वांगी 30 ते 40 रुपये किलो विकली जात आहे. यातून शेतकऱ्याचा वाहतूक खर्च देखील निघाला नसून रात्रंदिवस शेतात राबवून शेतकऱ्याच्या हाती अखेर निराशा पडली आहे.
महत्वाच्या बातम्या;
ईकोदीप निर्मिती उद्योग हा महिला सक्षमीकरणाचा महामार्ग- डॉ.लक्ष्मण प्रजापत
तू हुबेहूब सनी देओलसारखा दिसतोस, शेतकऱ्याने विचारताच सनी देओल म्हणाला मीच आहे..
शेतकऱ्यांनो उन्हाळ्यातील फळबागांचे व्यवस्थापन
Published on: 09 March 2023, 10:06 IST