News

देशात नुकत्याच काही दिवसांपूर्वी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल शांत झाले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Assembly elections) पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास चार महिन्यापेक्षा अधिक काळ स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात (In the international market) या दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती आकाशाला गवसणी घालत होत्या मात्र असे असले तरी तेल कंपन्यांनी निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणे जवळपास चार महिने टाळले.

Updated on 26 March, 2022 1:47 PM IST

देशात नुकत्याच काही दिवसांपूर्वी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल शांत झाले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Assembly elections) पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास चार महिन्यापेक्षा अधिक काळ स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात (In the international market) या दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती आकाशाला गवसणी घालत होत्या मात्र असे असले तरी तेल कंपन्यांनी निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणे जवळपास चार महिने टाळले.

आता पाच राज्यातील निवडणुका संपुष्टात आल्या असून निकाल देखील लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोजाना आता वाढ बघायला मिळत आहे. मागील पाच दिवसात तब्बल चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गत पाच दिवसात जवळपास तीन रुपये 20 पैसे प्रति लिटर पेट्रोलचे दर वाढले आहेत. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीयांची प्रपंचांची गाडी गाडीला तेल टाकत-टाकत कदाचित खाली येऊ शकते असे सांगितले जाऊ लागले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 मार्चपासून रोजाना वाढ बघायला मिळत आहे. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये प्रतिलिटर एवढा आहे कर डिझेलचा दर 88.87 रुपये प्रति लिटर एवढा आहे. असे असले तरी महाराष्ट्रात मात्र पेट्रोलच्या दराने शंभरी कधीच पार केली असून सध्या राज्यात सर्वत्र पेट्रोलचे दर 110 रुपये प्रति लिटरहुन अधिक बघायला मिळत आहेत.

असे सांगितले जात आहे की येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. तज्ञांच्या मते पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 25 रुपयांची वाढ होऊ शकते. यामुळे सामान्य नागरिक मोठा धास्तावला आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास एक महिन्यापासून जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धाचे चटके आता भारतीयांना देखील बसू लागले आहेत. या युद्धामुळे खनिज तेलाच्या किमती आकाशाला गवसणी घालू पाहात आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल 110 रुपये डॉलर पर्यंत पोहचली आहे. यामुळे तेल कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे विश्लेषक लोकांनी सांगितले आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये सुरू असलेली दरवाढ केव्हाच झाली असती.

मात्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ तात्पुरती स्थगित केली केली असल्याचे समजत आहे. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पेट्रोल डिझेल समवेतच गॅसच्या किमती देखील आता आकाशाला गवसणी घालू लागल्या आहेत. एकंदरीत सध्या सर्वसामान्य नागरिकांचे खाणे आणि फिरणे मोठ्या मुश्कीलीचे होऊन बसले आहे.

यामुळे मध्यमवर्गीयांचे महिन्याचे असणारे बजेट विस्कळीत झाल्याचे सांगितले जातं आहे. विश्लेषक लोकांनी पेट्रोल डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे जर हे भाकीत खरं ठरलं तर निश्चितच भविष्यात मध्यमवर्गीय लोकांना गाडी ऐवजी सायकलवर फिरणे भाग पडणार आहे.

हेही वाचा:-

मोठी बातमी! 31 मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील 400 कोटी रुपये, वाचा याविषयी

मराठवाड्याचा पाण्याचा तंटा मिटणार! कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याकडे वळणार- जयंत पाटिल

English Summary: what are u saying petrol rate increased upto 25 rupees
Published on: 26 March 2022, 01:47 IST