News

सध्या राज्यात तसेच संपूर्ण देशात कांद्याला अतिशय कवडीमोल दर (Onion Rate) मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Grower Farmer) मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या मिळत असलेल्या कवडीमोल दरात कांद्यासाठी झालेला खर्च (Production Cost) काढणे देखील मुश्किल असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी नमूद करीत आहेत.

Updated on 07 May, 2022 3:35 PM IST

सध्या राज्यात तसेच संपूर्ण देशात कांद्याला अतिशय कवडीमोल दर (Onion Rate) मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Grower Farmer) मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या मिळत असलेल्या कवडीमोल दरात कांद्यासाठी झालेला खर्च (Production Cost) काढणे देखील मुश्किल असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी नमूद करीत आहेत.

यामुळे आधीच बेजार झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुलतानी संकटांचा देखील सामना करावा लागत आहे. मनमाड एपीएमसीमध्ये (Manmad APMC) एका शेतकऱ्याचा कांदा लिलाव झाला, व्यापारीने बोली लावून कांदा खरेदी केला मात्र शेतकरी कांदा खाली करण्यासाठी व्यापाऱ्याच्या गोडाऊन वर गेला असता व्यापार्‍याने कांदा घेण्यास साफ मनाई केली.

यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सदर प्रकरणाची मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे (Manmad Agricultural Produce Market Committee) तक्रार केली. याबाबत किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे यांनी बाजार समितीकडे पाठपुरावा केला आणि सदर शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला.

महत्वाच्या बातम्या:

Watermelon Farming : एका एकरात तब्बल 3 लाखांचे उत्पन्न; डॉक्टरांनी प्रगत शेतकऱ्यांना लाजवलं

LPG Price : घरगुती एलपीजी गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांचे बजट पुन्हा कोलमडलं

याबाबत अधिक माहिती अशी की, कांदा उत्पादक शेतकरी संजय हेंबाडे यांनी आपला कांदा मनमाड एपीएमसीमध्ये विक्रीसाठी आणला होता. संजय यांनी ट्रॅक्टर मध्ये कांदा विक्रीसाठी आणला होता. लिलावादरम्यान कांदा व्यापाऱ्यांनी 765 रुपये प्रतिक्विंटल दराने संजय यांचा कांदा खरेदी केला. लिलाव झाल्यानंतर संजय यांनी आपला ट्रॅक्टर व्यापारी रुपेश ललवाणी यांच्या खळ्यात कांदा खाली करण्यासाठी नेला.

कांदा खाली करताना व्यापारी ललवाणी यांनी हा कांदा साठवण्यासाठी योग्य नसल्याचा युक्तिवाद करत मला हा कांदा खरेदी करायचा नाही असा आडमुठ्या पणा दाखवला अन ट्रॅक्टर माघारी नेण्यास सांगितले. याबाबत संजय यांनी मनमाड एपीएमसीमध्ये तक्रार नोंदवली. याबाबत किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे यांना माहिती मिळताच त्यांनी आक्रमक पवित्रा अंगीकारला.

यानंतर बाजार समितीचे प्रशासक विश्वास राठोड यांनी प्रकरण जाणून घेतले. यानंतर बाजार समिती प्रशासकांनी व्यापारी रुपेश ललवाणी यांना संबंधित शेतकऱ्याचा कांदा खाली करण्यास सांगितले.  यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळले.

मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडलेला हा प्रकार शेतकऱ्यांची कशा पद्धतीने कोंडी केली जाते हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर असा प्रकार घडत असेल तर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कुठे विक्रीसाठी न्यावा असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

English Summary: What a stubbornness! The trader is reluctant to buy onions even after the auction; Finally the farmer made a complaint and ..
Published on: 07 May 2022, 03:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)