महावितरणची थकबाकी फक्त योजनेला पश्चिम महाराष्ट्रात तीन शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या योजनेचे जवळजवळ सहा लाख 45 हजार 812 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यापैकी एक लाख 94 हजार 381 शेतकऱ्यांनी थकबाकी मध्ये66 टक्के सूट घेतसंपूर्ण वीज बिले कोरीकेले आहेत.
या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत 35 हजार 619 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच चालू व थकीत वीज बिल भरणा मधून ग्रामपंचायती व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी 33 टक्के आकस्मिक निधी जमा करण्यात आला आहे. तसेच जमा झालेल्या या निधी मधील विज यंत्रणेच्या कामांसाठी आतापर्यंत 202 कोटी 67 लाख रुपये कर्जाचे 5757 कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आली आहे.
कृषी पंपाचे वीज बिलामध्ये थकबाकी मुक्त होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील 12 लाख पन्नास हजार शेतकर्यांच्या मूळ थकबाकी मधील व्याज व विलंब आकारातील सूट तसेच महावितरणकडून निर्लखनाचे एकूण 2 हजार 644 कोटी 79 लाख रुपये माफ करण्यात आले. तसेच वीज बिलांच्या दुरुस्ती मधून 199 कोटी 39 लाख रुपयांचे समायोजन करण्यात आले आहे.त्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांकडे वीज बिलापोटी सात हजार 997 कोटी 75 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे.
त्यापैकी 50 टक्के थकबाकीचा 31 मार्च 2022 पर्यंत भरणा केला तर उरलेली 50 टक्के म्हणजे तब्बल 3 हजार 998 कोटी 87 लाख रुपयांची माफी मिळणार आहेपश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने पुणे, सातारा,सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीज बिलांची थकबाकी मुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत असून याजिल्ह्यांमधील सहा लाख 45 हजार 812 शेतकरी सहभागी झाले आहेत.
Published on: 11 January 2022, 05:14 IST