News

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ब्रिटिशपूर्व काळात १० जानेवारी १९३८ मध्ये २५ हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर घेऊन जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने ब्रिटिश पूर्व काळातील शेतकऱ्यांसाठी लढणारे शेतकऱ्यांचे कैवारी बनले होते.

Updated on 01 February, 2023 10:15 AM IST

ब्रिटिश पूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी हिताची संकल्पना मांडली होती. शेतात शेतकरी आणि भाजी मार्केटमध्येही शेतकरीच दिसायला हवेत, असा विचार त्यांनी शेतकऱ्यांप्रति व्यक्त केला होता. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ब्रिटिशपूर्व काळात १० जानेवारी १९३८ मध्ये २५ हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर घेऊन जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने ब्रिटिश पूर्व काळातील शेतकऱ्यांसाठी लढणारे शेतकऱ्यांचे कैवारी बनले होते. शेती आणि शेतकऱ्याला पोषक असणारी संकल्पना ही अनेक शेतकरी सभांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली.

म्हणून दुष्काळ सदृश परिस्थिती हटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचे नियोजन करण्याच्या उपाययोजना आखल्या होत्या. पाण्याचे प्रकल्प उभारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जलतज्ञ म्हणूनही ओळखले जातात. आज पाण्याच्या नियोजनाअभावी शेतकरी हा अनेक समस्यांमध्ये अडकून पडलेला आहे. शेतकऱ्यांचे शेती करण्याचे नियोजन फसते आहे. दुष्काळाची परिस्थिती दूर करण्याकरिता यंत्रणेने बाबासाहेब यांचे पाणीविषयक आणि शेतीविषयक विचार है सत्यात उतरविले पाहिजेत.

शेतकऱ्यांनी आपला माल हा मार्केटमध्ये घेऊन गेले पाहिजे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणारा होता. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळवून देणारा होता. ग्राहकवर्गालाही रोजची रोज ताजी भाजी मिळवून देणारा हा शेतकरीच असतो.

आज शेती पिकविणारा शेतकरी दारिद्र्यात आहे आणि कमी भावाने शेतकऱ्यांचा माल घेणारा व्यापारी वर्ग धनवान झाला आहे. शेतात जो राबतो तोच खरा धनवान व्हायला हवा. परंतु ते चित्र आज उलटे झाले आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे शेतकऱ्यांचेही नेते होते, हे दुर्लक्षित करता येणार नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळातही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ते ब्रिटिशांविरोधात लढले. शेती आणि शेतकन्यांसाठी मोठा संघर्ष त्यांनी उभा केला होता. शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद भूषवीत ते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी खंबीर पणे उभे राहिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ एप्रिल १९२९ ला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते, स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तयार केला. हा जाहीरनामा शेतकऱ्यांची दुःखे आणि संकटे मांडणारा ठरला.

असा तसा नाय! तब्बल १२ कोटींचा रेडा हाय, रेडा पाहून शेतकरी झाले थक्क

त्यांनी ब्रिटिशांपुढे ठेवलेल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आपण आपल्या हक्कांचा लढा हा असाच पुढे चालू ठेवला पाहिजे, असे आवाहन जमलेल्या शेतकरी वर्गाला केले होते. तुमची दुःखे अनेक आहेत. ती दूर करण्यास तुम्हीच तुमची कंबर कसली पाहिजे. त्यासाठी तुमची संघटना जितकी मजबूत कराल तेवढेच तुमचे प्रश्न लवकर आणि सहजरीत्या सोडवले जातील, असे मोलाचे मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९३८ ला केले होते.

शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसविण्याचे काम राज्य घटनेतील तरतुदीमध्ये करण्यात आलेले आहे. तुकड्यांमध्ये वाटून केली गेलेली शेती ही तोट्यांमध्ये जाते. त्यामुळे सामूहिक शेती करण्यास त्यांनी त्या काळात सांगितले. स्वतंत्र मजूर पक्षाचा १९५१ चा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

त्यावेळी त्यांनी या जाहीरनाम्यात शेतीचे यांत्रिकीकरण झाले पाहिजे, परंपरागत शेती करीत असलेल्या पद्धतीत बदल झाला पाहिजे, असे जाहीर केले. शेती व शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणाचे व लाभाचे कायदेही बनविले गेले. परंतु कायदे हे ठोस अंमलबजावणी न करण्यातच अडकून पडले. कोकणातील शेतकऱ्यांची खोतांच्या जाचातून मुक्तता मिळावी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३७ मध्ये मुंबई विधिमंडळात कायद्याचे विधेयक मांडले.

शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत! आता गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

१० जानेवारी १९३८ सालच्या शेतकरी मोर्चाने कोकण दौऱ्याची पाहणी यंत्रणेकडून घडवून आणली. शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजही समस्त शेतकरी वर्गांसाठी प्रेरणास्त्रोतच आहेत.

त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सक्षम शेतीसाठी बाबासाहेब यांची शेती विषयक ध्येय-धोरणे अभ्यासली पाहिजेत. शिवाय शेतकऱ्यांनी शेतात सदैव राबत असताना त्याने आपला माल बाजारात घेऊन जात असताना चांगला भाव ही उपलब्ध करून घेण्यासाठी लढत राहिले पाहिजे. तरच शेतकरी खऱ्या अर्थाने सुखाने जगेल. 

महत्वाच्या बातम्या;
गायीच्या दूध खरेदीची स्पर्धा, राज्यात आजपासून सहकारी, खाजगी डेअऱ्यांकडून दूध दरवाढ
बातमी कामाची! आता रेशीम शेतीसाठी एकरी एक लाखाचे कर्ज मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा
गाढवीनीच्या दुधातून कमवतायत बक्कळ पैसा, 1 लिटर दुधाची 5 हजारात विक्री

English Summary: welfare farmers, farmers needed fields and market as well
Published on: 01 February 2023, 10:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)