देशात मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. राज्यातही पशूपालन शेतकरी बांधव शेती पूरक व्यवसाय म्हणून करीत असतात. आपण आतापर्यंत हजार रुपये किमतीचे बोकड बघितले असतील पण; आज आम्ही आपणास एका अशा बोकडा विषयी माहिती सांगणार आहोत ज्याची किंमत आणि वैशिष्ट्ये ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
मित्रांनो भंडारा जिल्ह्यात एक असा बोकड आहे ज्याचे वजन तब्बल दीडशे किलो असून उंची पाच फूट एवढी आहे. हो! बरोबर ऐकलं आपण भंडारा जिल्ह्यात तब्बल दीडशे किलो वजनी व पाच फूट उंचीचा बोकड आहे. या बोकडाला त्याच्या मालकाने पुष्पा असे नाव ठेवले आहे.
या बोकडाचा विशालकाय आकार बघता हा भंडारा जिल्ह्यातील एकमेव मोठा बोकड असल्याचा दावा याच्या मालकाने केला आहे. विशेष म्हणजे या बोकडाचे नाव साउथ मधील सुप्रसिद्ध चित्रपट पुष्पा च्या नावावर आहे, म्हणून ज्या पद्धतीने बॉक्सऑफिसवर पुष्पा हीट झाला आहे अगदी त्याच धर्तीवर हा बोकड देखील बाजारपेठेत हीट होत आहे. या बोकडाचा विषय काय आकार बघून अनेक खरेदीदार याला खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. भंडारा जिल्ह्यातील चांदोरी गावात या बोकडाला बघण्यासाठी तसेच खरेदी करण्यासाठी माणसाची एकच झुंबड उडालेली बघायला मिळत आहे.
जिल्ह्यातील साकोली तालुका च्या मौजे चांदोरी येथील देवाजी हातझाडे यांच्याकडे हा विशाल काय बोकड आहे. विशेष म्हणजे देवाची चांदोरी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. हातझाडे यांच्याकडे असलेला हा पुष्पा बोकड 150 किलो वजनाचा पाच फूट उंचीचा आणि पाच फूट लांबीचा विशाल काय असा आहे.
या विशाल काय बोकडाला बघितल्यानंतर चांगल्या चांगल्या लोकांचा थरकाप उडत असतो. आता तुम्ही म्हणत असाल हा एवढा मोठा विशाल काय बोकड नेमक खातो तरी काय? तर आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, हा बोकड रोजना कुळवा भर तांदूळ तसेच कुळवा भर गहू खात असतो.
खुराक व्यतिरिक्त या बोकडास मसाज देखील द्यावी लागते. या बोकडाला फेरफटका मारल्यानंतर मसाज द्यावी लागते. असे सांगितले गेले आहे की, हा बोकड रस्त्याने जात असतानात्याचा विशालकाय आकार बघता लोक त्यालावाट मोकळी करत असतात. यामुळे त्याचा पुष्पा पिक्चर मधील पुष्पा सारखा दरारा असल्याचे समजत आहे. चांदोरीचा पुष्पा बोकड संपूर्ण देशात मोठा चर्चेचा विषय बनला असून याला खरेदीसाठी हैदराबादहुन आलेले व्यापारी गर्दी करत आहेत.
या पुष्पाचा विशाल काय आकार व दरारा बघता त्याच्या मालकाने त्याची किंमत दोन लाख रुपये एवढी ठेवली आहे. या बोकडाला खरेदीसाठी अनेक व्यापाऱ्यांनी बोली लावल्या मात्र अपेक्षित किंमत मिळत नसल्याने या बोकडाचे मालक देवाजी हातझाडे झुकेगा नही साला असे म्हणत याच्या विक्रीस साफ नकार देत आहेत. पुष्पाचा विशाल काय आकार आणि तेवढीच महागडी त्याची किंमत बघता संपूर्ण भंडारा जिल्ह्यात या पुष्पाची मोठी चर्चा रंगली आहे आणि याला बघण्यासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक गर्दी करीत आहेत.
Published on: 31 March 2022, 10:47 IST