सध्या मान्सून चांगला सकरे झाल्याने राज्याच्या बऱ्याच भागात पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. तसेच कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस आहे.
राज्यात पुढील पूर्ण आठवडाभर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सातारा विदर्भ आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनार्यालगत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून अर्थ समुद्रावरुन त्यामुळे मान्सूनचे प्रवाह बळकट झाले आहेत.
त्यामुळे या पोषक परिस्थिती मुळे राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. आता हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम राजस्थान पासून ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रात पर्यंत सक्रिय आहे. तसेच महाराष्ट्रासह मध्य भारतात हवेचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र कायम आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरून वार यांचे प्रवाहावर वाढू लागल्याने पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दोन-तीन दिवसांपासून राज्यात विविध भागात कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्याने हवेत चांगलाच गारवा तयार झाला आहे. मागच्या आठवड्यात वाढलेला तापमानाचा पारा यामुळे कमी होण्यास मदत झाली आहे.
गेल्या बरेच दिवसांपासून दिल्लीसह वायव्य भारतातील मान्सूनचे आगमन काही प्रमाणात लांबले होते परंतु दहा जुलै रोजी मान्सून दिल्लीत दाखल होण्याची शक्यता होती. परंतु अजून पर्यंत मान्सूनची हवी तशी प्रगती झालेली नसून तो मंदावलेला आहे. आज दिल्लीच्या वायव्य भारतात मान्सून प्रगती करेल अशी शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वायव्य भारताकडे येऊ लागल्याने मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण आहे.
Published on: 12 July 2021, 01:33 IST