News

राज्यातील तापमान कमी झाले असून तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली आला आहे. दरम्यान पुर्वमोसमी पावासासाठी पोषक हवामान तयार होत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने जोरदार वाऱ्याचे प्रवाह वाहत आहेत.

Updated on 21 April, 2020 1:50 PM IST


राज्यातील तापमान कमी झाले असून तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली आला आहे.  दरम्यान पुर्वमोसमी पावासासाठी पोषक हवामान तयार होत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने जोरदार वाऱ्याचे प्रवाह वाहत आहेत.  आज राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  दिवसा दुपारपनंतर ढग जमा होत असल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी होत आहे.  जळगाव, धुळे, मालेगाव, अकोला,. वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापमान चाळीशीच्या खाली घसरले आहे.  सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वाशीम येथे देशातील उच्चांकी ४२. ६ अंश सेल्सिअस तापमनाची नोद झाली आहे.  हंगामातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेल्या अकोला येथे तापमान ४०.६ अंशापर्यंत खाली घसरले आहे.

उत्तर भारताच्या अनेक हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार ईशान्य भारतात काही दिवसांपासून गडगडाटीसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  ज्यामुळे काही ठिकाणी सामान्य जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, तटीय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ बद्दल जर आपण चर्चा केली तर काही ठिकाणी हलके ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.  दरम्यान येत्या २४ तासात ईशान्य भारतात मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. कर्नाटक किनारपट्टीपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्याच्या चारही  विभागात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.   तर देशातील इतर राज्यात राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केरळ येथे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम प्रकारचा  पाऊस होईल.

English Summary: weather update thunderstorms and heavy rain are expected in state's some part
Published on: 21 April 2020, 01:43 IST