सोमवारी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या तीव्र झळा निर्माण होण्यापूर्वी भारताचा पूर्व किनारा सतर्क झाला होता. काही दिवसानंतर देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वादळाने वाटचाल केली या चक्रीवादळात अनेक लोकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले .चक्रीवादळ यास ,आयएमडीने म्हटले आहे की बंगालच्या उपसागरावरील 'यास' चक्रीवादळ तीव्र झाली आहे आणि 26 मे रोजी ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारी ओलांडण्याची शक्यता आहे आणि याचा मोठा परिणाम हवामानावर होण्याचा अंदाज आहे.
बचाव मोहिम काम सुरु :
ओडिशा सरकारने सोमवारी बचाव व मदत पथकाची मोठी तुकडी पश्चिम बंगालच्या सीमेवरील बालासोर जिल्ह्यात दाखल केली. या ठिकाणी वादळामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे.आयएमडीने यासच्या तीव्र परिणामामुळे समुद्रात 2-4.5 मीटर उंच भरतीच्या लाटांचा अंदाज वर्तविल्यानंतर सर्व सखल प्रदेशात मोठ्या प्रमाणात निर्वासन अभियान सुरू केले जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.भारतीय हवामान खात्याने सांगितले. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या पूर्वेकडील राज्यांमध्ये वादळाचा अंदाज वर्तविला जात आहे.
हेही वाचा:न उच्चारता येणारी चक्रीवादळाची नावे येतात कशी; कशाप्रकारे दिले जाते चक्रीवादळाला नाव
संभाव्य बचाव आणि पुनर्प्राप्ती कार्यांसाठी दोन राज्यांमध्ये आपत्ती निवारण दल यापूर्वीच तैनात करण्यात आले असून किनारपट्टीचे क्षेत्र रिकामे केले जात आहे. भारताच्या हवाई दल आणि नौदलाने सांगितले की त्यांनी मदतकार्य करण्यासाठी काही हेलिकॉप्टर आणि जहाज तयार ठेवले आहेत.गेल्या आठवड्यात चक्रीवादळ तौक्ते याने पश्चिमेकडील राज्यांमध्ये कमीतकमी 140 लोकांचा बळी घेतल्यानंतर हे आता दुसरे वादळ असेल.
ढाका येथील देशाच्या हवामान खात्याच्या हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे की जहाजांनी चॅटोग्राम, मोंग्ला, कॉक्स बाजार आणि पायरा हि सागरी बंदरे सोडली पाहिजेत.आणि मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की भारतातील चक्रीवादळ वारंवार येत आहेत आणि हवामानाच्या बदलत्या नमुन्यांमुळे ते अधिक तीव्र झाले आहेत.
Published on: 25 May 2021, 08:55 IST