राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र (Middle Maharashtra) आणि कोकणातील काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता आहे.
या भागात पडणार पाऊस
11 एप्रिलपर्यंत सांगली, पुणे, कराड उमरगा, देवणी, सोलापूर, आटपाडी, इस्लापूर, रत्नागिरी, चिपळूण, वाई, सातारा येथे चार दिवस ढगाळ वातावरण राहील, तर तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले गव्हाचे पीक क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. वादळामुळे अडसाळी उसाचे पीकही कोमेजले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा..! थेट पीक विमा कंपनीलाच शिकवला धडा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
कौतुकास्पद ! भारताचा कृषी क्षेत्रात नवा विक्रम; बातमी वाचून तुम्हांलाही वाटेल अभिमान
उष्णतेची पारा वाढला
सध्या विदर्भात उष्णतेची लाट चांगलीच वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. विदर्भासह उर्वरित राज्यांमध्ये कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवारी अकोल्यात ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
विदर्भातील बहुतांश भागात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. राज्याच्या बहुतांश भागातील किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विदर्भात उष्णतेची लाट आणि उकाडा अधिक जाणवू लागला आहे. बुधवारपर्यंत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Smartphone and Tablet: 10 लाख तरुणांना मिळणार मोफत स्मार्टफोन आणि टॅबलेट; असा घ्या लाभ
Business Idea : फक्त 10-15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, कमी वेळात लाखोंची कमाई
Published on: 11 April 2022, 10:43 IST