राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट बघायला मिळू शकते. भारतीय हवामान खात्याने (IMD) यासंदर्भात नुकतेच एक अलर्ट जारी केले आहे. राज्यातील मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा अंदाज असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने नमूद केले आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक हवामान खात्याने (By the Regional Meteorological Department) आगामी चार-पाच दिवसात हिंगोली समवेतच मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यात पावसात समवेतच वादळी वारे वाहण्याचा देखील अंदाज असल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. मित्रांनो गेल्या चार-पाच दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरण कायम राहिले आहे आणि आता प्रादेशिक हवामान खात्याचा हा अंदाज रब्बी हंगामातील पिकांना धोकादायक सिद्ध होऊ शकतो.
आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे, रब्बीच्या सुरुवातीला देखील अवकाळी चे सावट होते तेव्हादेखील शेतकर्यांच्या पिकांना मोठा फटका बसला होता. शेतकरी राजाने यातून कसेबसे आपले सोन्यासारखे पीक वाचवले मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना तयार झालेले पावसाचे वातावरण उत्पादनात घट घडवून आणू शकते. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंताग्रस्त बनला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
आगामी काही दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल आणि सात ते आठ मार्च रोजी ढगाळ वातावरण कायम होईल. 8 तारखेला मराठवाड्यातील हिंगोली औरंगाबाद जालना बीड परभणी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद केली जाईल. त्यामुळे कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी शेतकऱ्यांना काढणीसाठी आलेल्या पिकांची काढणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 10 ताखेपासून 15 मार्चपर्यंत कमाल तापमान मध्यम राहणार असून किमान तापमानात घट राहणार आहे.
Published on: 05 March 2022, 10:58 IST