News

नुकत्याच काही दिवसापूर्वी भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) पावसासंबंधी एक अंदाज (Weather Forecast) वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे आगमन (Arrival of rains in Maharashtra) लवकरच होणार आहे. यामुळे निश्चितचं महाराष्ट्रातील जनतेला विशेषता शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers) दिलासा मिळणार आहे.

Updated on 08 May, 2022 12:03 PM IST

नुकत्याच काही दिवसापूर्वी भारतीय हवामान खात्याने  (Indian Meteorological Department) पावसासंबंधी एक अंदाज (Weather Forecast) वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे आगमन (Arrival of rains in Maharashtra) लवकरच होणार आहे. यामुळे निश्चितचं महाराष्ट्रातील जनतेला विशेषता शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers) दिलासा मिळणार आहे.

मात्र असे असले तरी राज्यात सर्वत्र जनता वाढत्या तापमानामुळे हैराण झाली आहे. आगामी काही दिवसात तापमानात अजून वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे राज्यातील जनतेस तूर्तास तरी उष्णतेपासून आराम मिळणार नसल्याचे चित्र बघायला मिळतं आहे. हवामान विभागाने सांगितले की, विदर्भात आजपासून अकरा मेपर्यंत उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Poultry Farming : उन्हाळ्यात 'या' पद्धतीने करा कोंबडीचे संगोपन; होणार फायदा

बिनडोकपणाचा कळस! अज्ञात इसमाने साठवलेल्या कांद्यावर टाकला युरिया; शेतकऱ्याचे हजारोचं नुकसान

सध्या बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) वादळाची (Asani Cyclone) परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र या वादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही असा अंदाज वर्तवला आहे. याउलट महाराष्ट्रात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे आसानी चक्रवादळ महाराष्ट्रात कुठलाच विपरीत परिणाम घडवणार नाही.

विदर्भात तापमान 45 अंश सेल्शिअसच्या दरम्यान पोहचले असून पुण्यातही तापमान 40 अंश सेल्शिअस तापमान नोंदवले जातं आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ होत आहे शिवाय विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनता उकाड्याने अक्षरशः हैराण झाली आहे.

चक्रीवादळ आणि महाराष्ट्र

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळचे संकट घोंगावत आहे. रविवारी अर्थात आज सायंकाळ पर्यंत याची तीव्रता वाढणार आहे. हवामान खात्यानुसार हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या असानी चक्रीवादळात वाऱ्याचा वेग हा ताशी 75 किलोमीटर राहणार असा अंदाज आहे.

यामुळे मच्छीमारांनी यादरम्यान बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय समुद्रकिनारी जाऊ नये, असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. याशिवाय समुद्र किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्काली यंत्रणांही तैनात करण्यात आल्या आहेत. एकंदरीत या वादळाचा महाराष्ट्रवर काहीच विपरीत परिणाम होणार नाही. मात्र आगामी काही दिवस उष्णतेची लाट येणार असल्याने जनतेला उकाड्यापासून अजूनच त्रास सहन करावा लागणार आहे.

कुठं बरसतील पावसाच्या सऱ्या

या असानी चक्रीवादळामुळे भारतातील अंदमान निकोबार इथं पाऊस पडणार असल्याचे सांगितले जातं आहे. या वादळ दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात वादळाची तीव्रता मुळे पाऊस हजेरी लावणार आहे.

English Summary: Weather Forecast: Storm in Bay of Bengal; What will be the effect on Maharashtra; Read on
Published on: 08 May 2022, 12:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)