भारत हवामानशास्त्र विभाग आयएमडी च्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत देशातील बर्याच राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे पश्चिम हिमालयी प्रदेशात जोरदार वाऱ्यासह वादळाचा अंदाज वर्तविला जात आहे.
येत्या काही दिवसात देशातील बर्याच राज्यात पाऊस पडण्याची शक्यता:
उष्णतेमुळे देशात लोकांना पाण्यासह अनेक परिस्थितीना सामोरे जावे लागत आहे . हवामानात गेल्या काही दिवसापासून कोणताही बदल न झाल्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. वाढत्या तापमानात भारत हवामान खात्याने आयएमडी आता दिलासा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत देशातील बर्याच राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्न्समुळे पश्चिम हिमालयी प्रदेशात 17 एप्रिलपर्यंत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील आणि वादळाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.
हिमाचल, लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडेल:
आयएमडीच्या म्हणण्यानुसार आज जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगित बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज आणि उद्याही गारपीटीचे वादळ येऊ शकते. आज आणि उद्या हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या बहुतेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.पावसाच्या दरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम आणि पूर्व राजस्थानात 16 एप्रिल रोजी वादळी वारे वाहतील अशी शक्यता आहे.
आता वेगाने वाढणार्या तापमानात ब्रेक लावण्याची वेळ आली आहे. केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू, माहे आणि कराईकल येथे येत्या चार दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यासह कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय गोवा, मराठवाडा, महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश भागात मोठ्या वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये 18 एप्रिलपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Published on: 16 April 2021, 07:57 IST