गेल्या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजा पूर्णता मेटाकुटीला आल्याचे चित्र नजरेस पडत होते. शेतकर्यांना आशा होती की मागच्या वर्षी सुरु असलेली संकटांची मालिका निदान या नूतनवर्षात तरी संपुष्टात येईल. आणि खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई रब्बी हंगाम आतून काढता येईल. मात्र या नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या सर्व आशेवर पाणी फिरवून दिले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण नजरेस पडत होते, या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरित परिणाम झाल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत. जानेवारी महिन्याच्या मध्यात पावसाने थोडी उघडीप दिली खरीमात्र ढगाळ वातावरण सर्वत्र कायम होते त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले गेले.
शेतकरी राजांनी कसे बसे या खराब वातावरणातून रब्बी हंगामातील पिके वाचवली, आणि वाढवली. मात्र, पुन्हा एकदा राज्यात पावसाचे वातावरण तयार होत असल्याचे पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचे सावट बघायला मिळू शकते. भारतीय हवामान खात्याने राज्यातील पश्चिम भागात तसेच कोकणात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मध्ये कमालीची भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान खात्याचे मते, 22 ते 23 जानेवारी दरम्यान पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबईसमवेत संपूर्ण कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्या म्हणजे 21 आणि 22 तारखेला या भागात गारपीट होण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील उत्तर भागात अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात देखील हवामान खात्याने गारपीटीची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे अवकाळी पाऊस पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी काळ बनून बरसण्याचे चित्र आहे.
मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तसेच जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तेव्हा अवेळी आलेल्या पावसामुळे सर्वात जास्त हानी शेतकरी राजाची झाली होती. यादरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक बघायला मिळाला होता. तसेच गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने व गारपिटीने हजेरी लावल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
तसेच आता आगामी काळात पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस दस्तक देणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले असल्याने, शेतकरी वर्गात कमालीची भीती बघायला मिळत आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आगामी काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याने बळीराजा परत एकदा मोठ्या संकटात सापडणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 20 January 2022, 10:19 IST