देशातील शेतकऱ्यांवर दोन्ही बाजूने संकट ओढवलेले आहे. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात पुर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पावसामुळे तापमानातील पारा कमी झाला आहे. महाराष्ट्र राज्यात आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात पुर्वेकडील भारतात, तमिळनाडू, दक्षिणी भागातील कर्नाटकमधील भाग, केरळमधील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यासह आंध्रप्रदेश, उत्तराखंड, उत्तरी पंजाबमझधील काही भागातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव आणि धुळे येथे अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील २४ तासात केरळमध्ये जोरदार पाऊस झाला. केरळसह तामिळनाडू, कर्नाटक, रॉयलसीमाच्या काही भागातही पाऊस झाला. तर पुर्वेकडील राज्यातही हलक्या प्रतीचा पाऊस झाला.
महाराष्ट्रातील विदर्भासह, झारखंड, ओडिसा, पुर्वी मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगाणातील काही भागातही हलक्या प्रतीच्या पावसाने हजेरी लावली.
कर्नाटक आणि पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडला तर पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानमध्ये एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडला, अंदमान आणि निकोबार बेटांवर पावसाच्या हालचाली वाढल्या आहेत.
राजस्थानापूसन मध्यप्रदेश, मध्यमहाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. समुद्रावरुन होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगांची निर्मिती होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. राज्यावर आज आणि उद्या पावसाचे सावट कायम राहणार आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तर रविवारपासून राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ आकाशासह हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील काही भागात उन्हाचा चटका वाढल्याने तेथील तापमान चाळीशीच्या पुढे गेले आहे. यात मालेगाव, जळगाव, निफाड, सोलापूर, परभणी, अकोला, नांदेज, बुलडाणा, अमरावती, बह्मपुरी, नागपूर, वाशिम आणि वर्धा येथील तापमान चाळीशीपार गेले आहे.
Published on: 01 May 2020, 10:47 IST