पुणे जिल्ह्यामध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्र विभागातील काही भागांमध्ये काही प्रमाणत ढगाळ वातावरण निर्माण होणार असल्याची माहिती हवामान खाते विभागाने दिलेली आहे. ३ मार्च ते ५ मार्च या दोन दिवसांच्या दरम्यान पुणे तसेच दक्षिण महाराष्ट्र विभागातील काही भागांमध्ये या दोन दिवसात तापमान अगदी थोड्या प्रमाणात कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच तापमान कमी होत।असल्याने या दोन दिवसांच्या कालावधीत या भागात हलका पाऊस पडणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याने लावलेली आहे. त्यामुळे पुणेकरांना पुढील दोन दिवसात उन्हाळा नाही तर पावसाळा अनुभवायला भेटणार आहे तर दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.
३ ते ५ मार्च दरम्यान कोसळणार पाऊसाच्या हलक्या सरी :-
हवामान विभागाने सांगितले आहे की ३ मार्च ला संध्याकाळी ची वेळ ते ५ मार्च या दोन दिवसांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात पाऊसाची शक्यता नाकारता सुद्धा येत नाही. IMD ने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी म्हणजे आज आग्नेय बंगालच्या उपसागरावर म्हणजेच विषुववृत्तीय हिंदी महासागरावर कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे. पुण्यातील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात ३ मार्च आणि ४ मार्च या दोन दिवसांच्या कालावधीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत पुणे शहरात ढगाळ वातावरण होणार आहे.
पुण्यासह या भागात पडणार पाऊस :-
पुणे जिल्ह्यासह दक्षिण मराठवाडा तसेच दक्षिण व मध्य महाराष्ट्रात ३ ते ५ मार्च रोजी संध्याकाळी पासून ते सकाळ पर्यंत हलका पाऊस पडणार आहे जे की ही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे ती नाकारता येणार नाही. पुणे हवामान खात्याने प्रमुख अनुपम कश्यपी यांनी पुढे ही सांगितले की तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलसह दक्षिण भारतातील काही द्विकल्पीय भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि याचमुळे दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा पाऊस पडले असा अंदाज वर्तविला आहे.
पाऊसाची शक्यता नाकारता येणार नाही :-
महाराष्ट्र राज्यातील काही भागात अंशतः तसेच सामान्यतः ढगाळ वातावरण दिसून येणार आहे तसेच ३ ते ५ मार्च च्या दरम्यान तापमानात सुद्धा किंचित प्रमाणत घट होणार आहे. बंगालच्या उपसागरातून कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जोरदार आग्नेय वारे वाहणार आहे जे की या वाहत्या वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही प्रदेशांवर होणार आहे. सर्वसामान्यपणे मार्च मध्ये पाऊस पडत नाही मात्र पाऊसाची ही शक्यता नाकारता येणार नाही.
Published on: 02 March 2022, 06:34 IST