हिंदू धर्मामध्ये दसरा सणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी शस्त्रांचे पूजन आणि रावण दहन करून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. आज देशभरात दसरा सण साजरा केला जात आहे. या सणाला नागरिक नवीन वस्तू, सोने आदींची खरेदी करतात. तसंच जी आपल्या घरात शस्त्रे आहेत त्याचे पूजन देखील केले जाते.
शस्त्र पूजन मुहूर्त किती वाजता?
२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:४४ वाजता सुरू होईल आणि २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:१४ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार या वर्षी २४ ऑक्टोबरला दसरा सण साजरा केला जाणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, दसरा दिवशी नवीन वास्तुचे भूमिपूजन, लहान मुलांचे अक्षरलेखन, घरकाम, जावळ भरणं, नामकरण सोहळा, कान टोचणं, यज्ञोपवीत संस्कार आणि भूमिपूजन यासारखे उपक्रम करणं शुभ मानलं जातं. मात्र दसऱ्या दिवशी लग्नसोहळा केला जात ते निषेधपर मानले जातात.
दसऱ्याला रावणाचा मृत्यू
दसऱ्या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी रावण दहन केले जाते. रावणाचा पुतळा दहन केल्याने प्रत्येक व्यक्तीचा आंतरिक अहंकार आणि क्रोध नष्ट होतो. या दिवशी दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जनही केले जाते. दशमीलाच माता दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे ती विजयादशमी म्हणून साजरी केली जाते.
Published on: 24 October 2023, 10:46 IST