केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आज फसल बिमा योजना जनजागृती मोहिमेचा शुभारंभ झाला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठी चा पिक विमा सप्ताह आजपासून सुरू झाला.
या योजनेचा उद्देश आहे की देशातील प्रत्येक शेतकऱ्याला विमा कवच देणे हाय होय. यावेळी बोलताना नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, आतापर्यंत जवळजवळ शेतकऱ्यांचे 95 हजार कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले आहेत.
पंतप्रधान फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशी ही नरेंद्रसिंह तोमर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की राज्य सरकार आणि विमा कंपन्यांच्या अथक परिश्रमामुळेच गेल्या चार वर्षांमध्ये 17 हजार कोटी रुपयांच्या हप्ते शेतकर्यांनी जमा केले. या जमा केलेल्या हप्त्यामुळे त्यांना दाव्याची 95 हजार कोटी रुपयांची रक्कम मिळू शकली. या कार्यक्रमाप्रसंगी कृषिमंत्र्यांनी आय इ सी व्हेन ला हिरवा झेंडा दाखवला. या व्हॅनच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजने विषयी जनजागृती करत या सप्ताहात शेतकऱ्यांना अधिकाधिक योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जनजागृती मोहिमेसाठी लागणारी पत्रके, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावली ची पुस्तिका आणि मार्गदर्शक पुस्तिकेचे ही त्यांनी प्रकाशन केले.
या सप्ताहात या वर्षीच्या खरीप हंगामा अंतर्गत अधिसूचित सर्व प्रदेश, जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.
ज्या भागामध्ये आणि आदिवासी जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजनेचा प्रसार झाला नाही अशा भागात शेतकरी जागृतीवर भर दिला जाणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागातील आणि विकासोत्सुक जिल्ह्यातील शेतकर्यांसह या मोहिमेत महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी बोलतांना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आवाहन केले की, बँका, सर्व सामाईक सेवा केंद्रे, सर्व राज्य आणि योजनेशी संबंधित घटक, विमा कंपन्या या सगळ्यांनी एकत्र येऊन 75 तालुके आणि विभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.
Published on: 01 July 2021, 09:23 IST