News

ऊसाला पाणी अधिक लागत असल्याने सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते पुणे येथे बोलत होते.

Updated on 06 May, 2022 4:55 PM IST

ऊसाला पाणी अधिक लागत असल्याने सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुण्यात विधानभवन येथे शुक्रवारी (दि.६) आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत अजित पवार बोलत होते. याबाबत त्यांनी कृषी विभागाला प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. 

पवार म्हणाले, यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी असे निर्देश पवार यांनी दिले. ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे गाळप बंद झालेल्या कारखान्यांकडील हार्वेस्टर गाळप बाकी असलेल्या ऊसतोडणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. शेतात उभ्या असलेल्या ऊसाच्या वाहतुकीसाठी आणि एकरी तोटा भरून काढण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात रेशीम व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बोटे यांनी २०२२-२३ च्या खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात मुख्य पिकाखालील खरीप हंगामासाठी २ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. एकूण २७ हजार ६७६ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून १५ हजार १२५ क्विंटल उपलब्ध झाले आहे.

तर खतांचे २ लाख १५ हजार १२२ टन आवंटन असून ७४ हजार ३८६ टन खते उपलब्ध आहेत. यावर्षी ४ लाख १० हजार ७२ खातेदारांना ४ हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे नियोजन असून १०४७ कोटींचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस आमदार चेतन तुपे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते असून १० हजार विहिरींचे पुनर्भरण करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून बैठकीत सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 
हादगा वनस्पती आहे बहुगुणी; जाणून घ्या याबद्दल...
दिलासादायक बातमी! सिन्नर तालुक्यातील रतन इंडिया औष्णिक प्रकल्पातून लवकरच होणारी वीज निर्मिती

English Summary: We should turn to other crops instead of sugarcane, says Ajit Pawar
Published on: 06 May 2022, 04:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)