News

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो आहे,असं वक्तव्य केले आहे. तसेच आमच्या जागा वाढवण्यासाठी आम्ही राज्यभर दौरे करतोय, असंही ते म्हणालेत. आत्राम यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Updated on 28 October, 2023 12:45 PM IST

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो आहे,असं वक्तव्य केले आहे. तसेच आमच्या जागा वाढवण्यासाठी आम्ही राज्यभर दौरे करतोय, असंही ते म्हणालेत. आत्राम यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजितदादा मुख्यमंत्री होणार, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री असेल असा फॉर्म्युला ठरला आहे, असा दावाही धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे. दरम्यान, धर्मराव बाबा आत्राम यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांना समर्थन दिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरीकडे भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा ट्वीट केलेला मी पुन्हा येईन हा व्हिडीओ तासाभरातच डिलीट केला. याविषयी बोलताना आत्राम म्हणाले, भाजपने मी पुन्हा येईल हे ट्वीट मागे घेतले आहे. त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही. मात्र अजित दादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो आहे असं आत्राम म्हणाले.

English Summary: We have started working to make Ajit Pawar the Chief Minister Statement of Dharmarao Baba Atram
Published on: 28 October 2023, 12:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)