जळगाव जामोद-संग्रामपूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. त्यातुन किराणा किट त्यामध्ये साखर, चहा पावडर, अंगाचे साबण, कपड्याचे साबण, भांड्याचे साबण, पेस्ट, बिस्कीट व इतर संसार उपयोगी साहित्य दिले जात आहे.
तसेच महिलांसाठी नवीन साडी, वृद्ध महिलांसाठी पातळ, मुलींसाठी कुर्ते, महिलांसाठी ५०० सॅनिटरी पॅड व नवीन दर्जेदार ब्लॅंकेट ५०० असे साहित्य उभे राहिले. त्याचे दि. २७ जुलै २०२३ रोजी गाडेगाव खुर्द. (ता.जळगाव जामोद) येथे तर आज २८ जुलै रोजी रुधाना व वकाना (ता.संग्रामपूर) येथील ५०० कुटुंबाना वाटप केल्यानंतर केले.
काल एकलारा (ता.संग्रामपूर) येथे किराणा किट व महिलांसाठी नवीन साडीचे वाटप करण्यात आले. यावेळी 'स्वाभिमानी'चे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर (संग्रामपूर), सुनील अस्वार, गजानन धर्मे, आशिष नांदोकार, प्रवीण अस्वार, सचिन कोकाटे, प्रवीण येणकर, सचिन देशमुख, कपिल गायकी, हरिभाऊ गाडगे, भास्कर धर्मे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारण शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. अनेकांच्या घरादारामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मदतीची प्रचंड गरज आहे. याच गोष्टीचं गांभीर्य लक्षात ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला 11 महत्त्वाच्या सूचना याआधीच दिल्या आहेत.
तेरणा इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार धेनू ॲपद्वारे डिजिटल उद्योमीता प्रशिक्षण...
पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचावी यासाठी त्यांनी या सूचना दिल्या. अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे गेल्या चार दिवसांत राज्यातील कोणकोणत्या जिल्हे आणि तालुक्यात नुकसान झालं, प्रशासनाकडून कशी मदत करण्यात आली, याविषयी देखील माहिती दिली.
ऑगस्टमध्ये पावसाचा अंदाज कसा असणार? पुढील दोन आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज आला समोर, जाणून घ्या...
Published on: 01 August 2023, 10:43 IST