News

राज्यात 35 साखर कारखान्यांवर ही जबाबदारी देण्यात आली असून आतापर्यंत ऊसतोडणीमध्ये स्पर्धा करणारे कारखाने आता एकमेकांच्या मदतीला धावून जाणार आहेत. यामुळे आता तरी आपला ऊस तुटून जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Updated on 23 March, 2022 3:58 PM IST

पुणे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना आता या उसाचे गाळप करण्यासाठी प्रशासनाची पळापळ सुरु आहे. संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे आश्वासन दिले जात असताना अजूनही अनेकांचे ऊस फडातच आहेत. यामुळेच साखर आयुक्तांनी आता आपले क्षेत्र न पाहता कारखाना लगतच्या क्षेत्रावरील ऊसतोड करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता हालचालींना वेग आला आहे.

आता राज्यात 35 साखर कारखान्यांवर ही जबाबदारी देण्यात आली असून आतापर्यंत ऊसतोडणीमध्ये स्पर्धा करणारे कारखाने आता एकमेकांच्या मदतीला धावून जाणार आहेत. यामुळे आता तरी आपला ऊस तुटून जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साखर आयुक्तांनी ऊसतोडीसाठी हा मधला मार्ग अवलंबला असून याची अंमलबजावणी झाली तर ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

काहीतरी पदरात पडण्यासाठी सध्या शेतकरी पळापळ करत आहेत. यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसाची तोड व्हावी अशी मागणी उस्मानाबादचे आ. राणाजगतिजसिंह पाटील यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. यावर आता निर्णय घेतले जात आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

याबाबत आता अतिरिक्त ऊसाचा अहवाल दर आठवड्याला साखर आयुक्त कार्यालयाला सादर केला जात आहे. यावर विचार करून निर्णय घेतले जाणार आहे. त्यानुसार प्रादेशिक सहकारी संचालक, कारखान्यांचे शेतकी अधिकारी यांच्यामार्फत हे नियोजन केले जाणार आहेत. यामुळे हे कारखाने आता महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत. शिल्लक ऊसाची तोड करण्यासाठी विविध विभागातील 35 कारखाने हे स्वत:च्या ऊसाव्यतिरिक्त इतर कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस तोडणार आहेत.

यामध्ये बड्या साखर कारखान्याचा समावेश असणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्या कारखान्याकडून तोड त्याच कारखान्याकडूनच बीलही शेतकऱ्यांना मिळणार आहे. इतर साखर कारखाना क्षेत्रातील ऊसाची तोड करण्याची जबाबदारी ही कोल्हापुरातील कारखान्यांवर येणार आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढणार असला तरी ऊसतोड होणार आहे. यामुळे आता याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरूच; काही वेळातच झाले होत्याचे नव्हते...
आता पावसाळ्याच्या तोंडावरच बंद होणार साखर कारखाने, अतिरिक्त उसावर साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय...
गरीब शेतकरी वीजबिल भरत आहेत, राजकीय वरदहस्त असलेल्यांची वीजबिल भरलेच नाही, वाचा धक्कादायक आकडेवारी

English Summary: Way to ask for extra sugarcane! Responsibility placed on 35 large sugar mills in this division
Published on: 23 March 2022, 03:58 IST