News

कृषी महाविद्यालय अकोला मधील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेत किती उत्कृष्टपणे काम करतात हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

Updated on 04 June, 2022 7:25 PM IST

कृषी महाविद्यालय अकोला मधील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेत किती उत्कृष्टपणे काम करतात हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्या दहा वर्षांपासून एन एस एस मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. विद्यार्थी वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित आहेत.

राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा,

या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते. 

हे ही वाचा - कौतुकास्पद! कृषी महाविद्यालय अकोला येथे जागतिक सायकल दिन साजरा

दि.२५ मे ते ३१-मे दरम्यान राजा एन.एल. खान वुम्न्स कॉलेज प. मेदिनिपुर, प. बेंगाल येथे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प २०२२ संपन्न झाला. या राष्ट्रीय कॅम्प मध्ये संपूर्ण भारतातून १८ राज्यांनी सहभाग नोंदवला. यामधे कृषी महाविद्यालय अकोला येथील रा. से.यो.च्या ८ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी, गोंधळ, अभंग, वारकऱ्यांची वारी याद्वारे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन केले.

तसेच एक्सटेम्पपोर, पॅनल डिस्कशन, रंगोली ,पोस्टर ,फोटोग्राफी, एलॉक्युशन ,योगा हे होते. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यानी उत्सुकतेने प्रतिसाद नोंदवुन क्रमांक पटकावले. त्यात रांगोळी स्पर्धेत द्वितीय ,पोस्टर मेकिंग मध्ये तृतीय व प्रश्नमंजुषा मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. एकूण सहा स्पर्धांत पैकी तीन स्पर्धेत विद्यार्थ्यानी क्रमांक पटकावला. 

या मध्ये कृषी महाविद्यालय अकोला चे राम चांडक ,श्याम काळे ,ओम खंडार, ज्ञानेश मुंडे , धनश्री व्यव्हारे, श्रद्धा कटरे, आकांशा लांजेवार,गरिषा वार हे विद्यार्थी होते. वरील यशामध्ये डॉ.कुबडे सर ( विद्यार्थी कल्याण अधिकारी)

डॉ. लांबे सर (प्रमुख विस्‍तार शिक्षण विभाग)डॉ. खाडे सर,(प्रमुख कार्यक्रम अधिकारी) डॉ. योगिता सानप(सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प २०२२ मध्ये विजयी विद्यार्थ्यानी संघाचे डॉ.व्हि.एम भाले सर (कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला )यांनी अभिनंदन केले, तसेच डॉ.एस.एस माने सर (सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला) यांनीसुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व डॉ.कुबडे सर ( विद्यार्थी कल्याण अधिकारी) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच त्या सोबतच विद्यापीठात सगळीकडे विजेत्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे.

संकलन - कन्हैया गावंडे

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Waw College of agriculture Akola give congratulations to nss students
Published on: 04 June 2022, 07:13 IST