News

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या हिताकरीता जिल्हा प्रशासनाचा ‘वावर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम अकोलेकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. ॲप, वेबसाईट या सारख्या अत्याधुनिक तंत्राची जोड देऊन अत्यंत गुणवत्तापूर्ण ताजा शेतमाल थेट ग्राहकांना स्वस्त दरात ‘वावर’ च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. एकंदरीत ‘वावर’ हा अकोला जिल्हयाचा कायापालट करणारा उपक्रम ठरणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला.

Updated on 02 August, 2018 5:34 AM IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या हिताकरीता जिल्हा प्रशासनाचा ‘वावर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम अकोलेकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. ॲप, वेबसाईट या सारख्या अत्याधुनिक तंत्राची जोड देऊन अत्यंत गुणवत्तापूर्ण ताजा शेतमाल थेट ग्राहकांना स्वस्त दरात ‘वावर’ च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. एकंदरीत ‘वावर’ हा अकोला जिल्हयाचा कायापालट करणारा उपक्रम ठरणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला. 

नियोजन भवनात आज ‘वावर’ संदर्भात बैठक झाली. यावेळी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, सहकार उपनिबंधक गोपाळ मावळे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. 

‘शेतकरी ते ग्राहक’ ही ‘वावर’ची टॅगलाईन आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देऊन आत्महत्यांचे प्रमाण घटविण्याकरीता जिल्हा प्रशासनाने ‘वावर’ चा उपक्रम हाती घेतला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हयातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकरी ते ग्राहक या तत्त्वानुसार ग्राहकांपर्यंत पोहोचविल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे, यासाठी ‘वावर’ नावाने सहकारी संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने या उपक्रमाची दखल घेऊन २० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निश्चित केले आहे. प्राथमिक स्तरावर ‘वावर’च्या संदर्भातील कामकाज पूर्णत्वास गेले आहे. लवकरच सर्व बाबींची पूर्तता करुन ‘वावर’ क्रियान्वीत करण्यात येणार आहे. 
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, वेबसाईट, मोबाईल ॲप, कॉल सेंटर अशा आधुनिक तंत्राची ‘वावर’ला जोड देण्यात आली आहे.

याबरोबरीने मालाची ने-आण करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत माल पोहोचविण्यासाठी तरुण होतकरु ५०० शेतकऱ्यांना ई-कार्ट देण्याबरोबरच त्यांना मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ॲग्रो मॉल, कोल्ड स्टोरेज या सुविधादेखील उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे ‘वावर’ या नावाखाली शेतमालाच्या प्रत्येक वस्तुंचे ब्रॅण्डींग आणि मार्केटिंग जिल्हा प्रशासन करणार आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून ‘वावर’ निश्चितपणे यशस्वी ठरणार आहे. ‘वावर’च्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ‘वावर’च्या उपक्रमासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे.

प्रारंभी ‘वावर’ या नावाने नोंदणी करण्यात आलेले प्रमाणपत्र श्री. मावळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले. प्रास्ताविकात श्री. खवले यांनी ‘वावर’बाबत सविस्तर माहिती दिली. संगणकतज्ञ महेश नाफडे यांनी ‘वावर’ वेबसाईट व ॲपबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. जिल्हा कौशल्य विभागाचे सहायक संचालक श्री. ठाकरे यांनी ‘वावर’च्या अनुषंगाने कॅटरींग व संबंधीत बाबींचे सादरीकरण केले.

English Summary: 'Wavar' Project in Akola District for Agriculture Produce Selling
Published on: 02 August 2018, 05:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)