News

आगामी काही दिवसात उन्हाळा ऋतु प्रारंभ होणार आहे. कडक ऊन आणि अशा उन्हात सर्वात जास्त मागणी असते ती कलिंगडाची. सध्या मुंबईमध्ये कलिंगड विक्रीसाठी येऊ लागले आहेत. उन्हाळा सुरू होण्यास अजून काही दिवसांचा काळ आहे मात्र तत्पूर्वीच कलिंगड बाजारात दाखल झाल्याने खवय्यांना मोठी प्रसन्नता झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, किरकोळ बाजारात कलिंगडला 20 ते 25 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. साधारणत जानेवारी महिन्यात टरबुजचा हंगाम हा सुरू झालाच पाहिजे, परंतु यंदा टरबुजचा हंगाम लांबला. जानेवारी महिन्यात सुरू होणारा हंगाम जून महिन्यापर्यंत कायम राहतो मात्र यावेळी हंगाम उशिरा सुरू झाल्याने हंगामाचा शेवट देखील उशिरा होऊ शकतो असा अंदाज तज्ञांचा आहे.

Updated on 11 February, 2022 9:11 PM IST

यावर्षी हंगाम लांबण्याची महत्त्वाचे कारण म्हणजे अवेळी पावसाचे आगमन, अवकाळी पावसामुळेखरिपातील मुख्य पिकांचे तर नुकसान झाले मात्र रब्बी पिकांच्या हंगामावर देखील विपरीत परिणाम झाला अगदी त्याचप्रमाणे टरबुजाच्या हंगामावर देखील अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम बघायला मिळाला. आत्ता टरबुज चा हंगाम सुरू झाला आगामी काही दिवसात टरबुजाची अजून आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई एपीएमसी मध्ये रोजाना एक हजार क्विंटल टरबुजाची आवक होत असल्याचे बाजारपेठांच्या सूत्रांद्वारे कथन करण्यात आले. मुंबई एपीएमसीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर येथून तसेच गुलबर्गा अक्कलकोट या ठिकाणाहून टरबुजची आवक होत असल्याचे सांगितले जात आहे. कलिंगड खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मते, हंगाम नुकताच सुरू झाला आहे त्यामुळे आवक थोडी कमी आहे जसंजसा हंगाम पुढे जाईल तस तशी बाजारपेठेत कलिंगडची आवक वाढेल. 

या हंगामात कलिंगड ची मागणी वाढू शकते असे देखील व्यापाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. बाजारपेठेत आपण गडद हिरव्या रंगाची कलिंगडे बघत असतो या कलिंगड ला शुगर किंग या नावाने शेतकरी बांधव ओळखतात. हा कलिंगड चवीला अतिशय गोड म्हणूनच याचे नाव कदाचित शुगर किंग असे पडले असावे. जी कलिंगडे आकाराने मोठी असतात त्या कलिंगडाना नामधारी म्हणून ओळखले जाते ही नामधारी कलिंगडे विशेषता ज्यूस बनवण्यासाठी उपयोगात आणली जातात. 

या दोन कलिंगड व्यतिरिक्त खवय्यांची पहिली पसंद आणि उन्हाळ्यात सर्वात जास्त मागणी असलेला कलिंगड म्हणजे "शुगर क्वीन" याच्याही नावात शुगर आहे तसाच तो गोडही आहे. हा कलिंगड बाहेरून काळाभोर दिसतो आणि आतून याचा गर खूपच लाल असतो या कलिंगडची बाजारात मोठा थाट असतो, याला नेहमीच इतर कलिंगडपेक्षा अधिक भाव आणि अधिक मागणी असते. व्यापाऱ्यांच्या मते, सध्या उन्हाळा सुरू झाला आहे आणि सौम्य ऊन पडत आहे, मात्र जेव्हा ऊन वाढेल तशी कलिंगड खाण्यासाठी मनाची काहिली वाढेल.

English Summary: watermelon is coming in market sugar queen getting more demand
Published on: 11 February 2022, 09:11 IST