News

अनेकदा व्यापारी आकडीमोल भाव देऊन त्यांचा माल विकतो. यामुळे आता शेतकऱ्यांनीच यामध्ये काहीसा बदल करून आपल्या चार पैसे कसे जास्तीचे मिळतील याचा विचार करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी आता शेतकरी आपला माल विकत आहेत.

Updated on 25 March, 2022 12:34 PM IST

शेतकरी हा आपल्या शेतात दिवसरात्र कष्ट करत असतो, असे असताना मात्र त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. यामुळे तो अडचणीत येतो, अनेकदा व्यापारी आकडीमोल भाव देऊन त्यांचा माल विकतो. यामुळे आता शेतकऱ्यांनीच यामध्ये काहीसा बदल करून आपल्या चार पैसे कसे जास्तीचे मिळतील याचा विचार करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी आता शेतकरी आपला माल विकत आहेत. यामुळे त्यांना चांगले पैसे मिळत आहेत.

सध्या उन्हाळा सुरु झाल्याने अनेकांनी कलिंगडची लागवड केली आहे. व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दरात (Watermelon) कलिंगडची खरेदी केली जाते आणि हेच कलिंगड बाजारपेठेत अधिकच्या दराने विकले जात आहे. त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण स्वत:च्या शेतीमालावर (Traders) शेतकऱ्यांचाच काही हक्क राहत नाही. तसेच त्यांना चांगले पैसे देखील मिळत नाहीत.

अनेकांच्या लक्षात ही बाब येत असल्याने अनेक शेतकरी व्यापारी बाजूला सारुन स्वत:च कलिंगडची विक्री करत आहेत. त्यामुळे अधिकचे चार पैसे तर पदरी पडतच आहे पण ग्राहकांचेही समाधान होत आहे. गेल्या दोन वर्षापासून झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा लढवलेली शक्कल कौतुकास्पद आहे. यामुळे ग्राहकांना स्वस्त आणि शेतकऱ्यांना जास्त असे काहीसे घडत आहे.

कोरोना काळात शेतकऱ्यांनी जगाला जगवले, जीव धोक्यात घालून अनेकांच्या घरी माल पोच केला. यामुळे यामधून त्यांना चांगलाच अंदाज आला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आपला माल मोफत देखील विकला. दरवर्षी शेतकरी आपल्या शेतातील माल हा व्यापाऱ्यांना विकत असतो, मात्र यावर्षी शेतकरी स्वतः बाजारात जाऊन आपल्या फळांची चिल्लर विक्री करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे हेच फायदेशीर ठरत आहे.

आता अनेक ठिकाणी रोडच्या कडेला किंवा शेतातच शेतकऱ्यांनी विक्री सुरु केली आहे. काही शेतकऱ्यांनी कलिंगड विक्रीसाठी व्यापाऱ्यांची जागा ही शेतकऱ्यांनीच घेतली आहे. बाजारपेठेतले सूत्र शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शहरासह ग्रामीण भागात कलिंगड विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे तीन महिने केलेली मेहनत आणि आता मिळत असलेला मोबदला यामुळे शेतकरीही समाधानी आहे. यामधून शेतकऱ्यांना दुप्पटच पैसे मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
आता शिल्लक राहिलेल्या उसाला ५० हजारांचे अनुदान मिळणार? निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष..
दुःखद! बैलगाडा शर्यत जिंकली पण शर्यतीत अपघात होऊन गाडामालकाचा मृत्यू, परिसर हळहळला..
ज्यांनी ७ वर्ष धीर धरला आज ते झाले लखपती, रेशीम कोस उत्पादक शेतकरी मालामाल..

English Summary: Watermelon; Farmers, you sell your goods, why do you make money? Read all the math ...
Published on: 25 March 2022, 12:34 IST