News

गत वर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मागच्या वर्षी कोरोनामुळे शासनाने कडक निर्बंध लावले असल्याने शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या अक्षरशा नाकी नऊ आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. यंदा देखील कोरोनाव्हायरस हळू हळू देशात पाय पसरू लागला आहे. राज्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, यासाठी शासन दरबारी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत, राज्यात रात्री सहापासून ते सकाळी सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कडक निबंधामुळे शेतमालाच्या बाजारपेठा जणूकाही ठप्प झाल्या आहेत. राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे शेतकरी राजांनी कलिंगड व खरबूज लागवडिकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर येत आहे.

Updated on 16 January, 2022 9:11 PM IST

उन्हाळ्यात कलिंगड फळाची प्रचंड मागणी असते, कलिंगड थंड व खाण्यास अतिशय रुचकर फळ आहे यामध्ये असलेले पोषक घटक मानवी शरीरासाठी खूपच उपयोगी असल्याने याची मागणी उन्हाळ्यात कायम बनलेली असते. कलिंगड लागवड देशात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यात देखील विदर्भात याची लागवड लक्षणीय नजरेस पडते, विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कलिंगड चे यशस्वी उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात विशेषता रावळगाव वाढोणा या गावात कलिंगडाची शेती मोठ्या प्रमाणात नजरेस पडते तसेच येथे पिकवले जाणारे कलिंगड कोलकत्ता, दिल्ली, जम्मू काश्मीर या राज्यात विक्रीसाठी पाठवले जाते. या परिसरातील शेतकरी कलिंगड लागवडीतून चांगला मोठा नफा कमवित असतात.

मागील वर्षी कलिंगड ला 12 रुपये प्रति किलो बाजार भाव प्राप्त होत होता मात्र हा बाजार भाव जास्त काळ टिकू शकला नाही. त्यावेळी कलिंगडला कोरोना नामक ग्रहण लागले असल्याने बाजारभावात कमालीची घसरण नमूद करण्यात आली होती. तेव्हा कोरोना झपाट्याने वाढत असल्याने राज्यात सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे 12 रुपये प्रति किलो विकला जाणारा कलिंगड अक्षरशा चार रुपये प्रति किलोने शेतकऱ्यांना विकावा लागला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल झाले होते. काही शेतकऱ्यांवर सोन्यासारखे कलिंगड उकिरड्यावर फेकण्याची देखील नामुष्की ओढवली होती. त्यामुळे तेव्हा कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. राज्यात सर्वत्र संचार बंदी असल्याने बाजारपेठांना कुलूप होतं त्यामुळे कलिंगड खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडे माल खरेदी करण्यासाठी येतच नव्हते. त्यामुळे तेव्हा आकस्मिक तयार झालेल्या समीकरणामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते.

यावर्षी देखील कोरोनाव्हायरस झपाट्याने आपले पाय पसरवताना दिसत आहे, याशिवाय कोरोनाचा नवा वारिएंट ओमिक्रोन देखील झपाट्याने वाढत आहे. म्हणून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जातील आणि त्यामुळे बाजारपेठा पुन्हा बंद केल्या जातील आणि परत कलिंगड विक्रीसाठी अडचणी निर्माण होतील अशी भीती आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विशेषता अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड करण्याला नापसंती दर्शवली आहे. शेतकरी मित्रांनो गतवर्षी अचलपूर तालुक्यात जवळपास 25 हेक्‍टर क्षेत्रात कलिंगडची लागवड केली गेली होती. मात्र यावर्षी फक्त तीन हेक्टर क्षेत्रावरच कलिंगड लागवड नजरेस पडत आहे. जवळपास 20 ते 22 हेक्टर कलिंगडच्या क्षेत्रात घट नमूद करण्यात आली आहे.

English Summary: watermelon cultivation stopped due to corona
Published on: 16 January 2022, 09:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)