जून महिन्यात पावासाने सरासरी गाठली, जुलै महिन्यातही पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये यंदा तब्बल ४०२.९५ टीएमसी २८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये केवळ १२ टक्के पाणी साठा शिल्लक होता. मॉन्सून हंगामात चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही सर्व प्रकल्प ओसंडून वाहण्याची अपेक्षा आहे. विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा जून महिन्यातच राज्यातील सर्वच विभागांमध्ये पाणीसाठा वाढू लागला, तर जुलै महिन्यात पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
सातत्याने दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात सध्या २६ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमध्ये १६ टक्के पाणी शिल्लक आहे. पावसाने सातत्याने हजेरी लावल्यास पाणी पुरवठा करणाऱ्या नदी, नाले, ओढे, झरे वाहते राहणार असून धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढणार आहे. सध्या पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात २५ टक्के, पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागात ४१ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात सुमारे २६ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभा २३ टक्के आणि कोकणात ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरुन दिसून येते. नेहमी दुष्काळ पाहणाऱ्या मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाड्यातील ९६४ लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये ६७.५९ टीएमसी (२६ टक्के) पाणी आहे. विभागातील मोठया ४५ प्रकल्पांमध्ये ५८.४१ टीएमसी (३७ टक्के) मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ५.५१ टीएमसी (१५ टक्के) तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ३.६७ टीएमसी (६ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा आहे.
मराठवाड्यातील मांजरा, सिना कोळेगाव ही धरणे अद्यापही अचल पाणीसाठ्यात आहेत. जायकवाडी धरणात ३०.८२ टीएमसी (५५ टक्के ) चल पाणीसाठा आहे. धरणातील अचल पाणीसाठा विचारत घेतल्यास धरणात ५६.८८ टीएमसी पाणीसाठा आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील प्रमुख धरणांमध्ये सध्या १२०.९६ लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये ६७.५९ टीएमसी (२६ टक्के ) पाणी आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा अचल पातळीत आहे. मात्र एकूण अचल पातळीचा विचार करता धरणात उजनीत ५८.७३ टीएमसी पाणीसाठा आहे. तर कोयना धरणाच्या चल आणि अचल पातळीत मिळून ३५.६१ टीएमसी पाणीसाठा आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये १००.७० टीएमसी ( २३ टक्के) मध्यम ५० प्रकल्पांमध्ये १५.२३ टीएमसी (टक्के ३२)
नाशिक विभागातील नगर, जळगाव, नाशिक या तीन जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. मात्र धरणांमध्ये समाधनकारक पाणीसाठा होण्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ५६.४५ टीएमसी ( २७ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागात यंदा दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक नद्यांना आल्याने धरणांची पाणीपातळी वेगाने वाढू लागली आहे. विभागात सर्व प्रमुख धरणांमध्ये ५३.४९ टीएमसी (९४६ टक्के ) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या धरणांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा होता.
Published on: 08 July 2020, 01:27 IST