News

पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यातील 22 जिल्हे कोरडे आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Updated on 06 September, 2023 5:18 PM IST

Water Issue News :

राज्यात यंदा पावसाने कमी हजेरी लावली आहे. यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी दिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पाऊस होईल अशी अपेक्षा होती. पण सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला तरी राज्यात पावसाने हजेरी लावली नाही. पावसाची आशा लावून बसलेल्या बळीराजाच्या पदरी अद्यापही निराशाच आहे.

पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यातील 22 जिल्हे कोरडे आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 20 टक्क्यांपेक्षा धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे.

पावसाच्या कमतरतेचा राज्यातील पिकांवर देखील परिणाम झाला आहे. राज्यातील 2519 महसूल मंडळांपैकी 446 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा कमी पाऊस आहे. पंधरा दिवसापेक्षा जास्त काळ पाऊस नाही असा अहवाल कृषी आयुक्त कार्यालयाने दिलाय. 1955 गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 406 टँकर तैनात आहेत. 1054 महसूल मंडळातील पिकांवर त्याचा परिणाम झालाय, अशी माहिती मराठी वृत्तवाहिनी टिव्ही 9 ने दिली आहे.

पावसाची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे राज्यातील धरणसाठ्यात मागच्या वर्षीची सरासरी देखील गाठतील की नाही अशी चिंता आहे. 5 सप्टेंबरपर्यंत राज्यातील केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे. राज्यात मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 16 धरणं पुर्ण क्षमतेने भरली होती.

दरम्यान, ऑगस्ट महिना संपला तरी राज्यात अपेक्षित पाऊस नाही. यामुळे राज्यात येणाऱ्या काही दिवसांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील धरणातील साठा 64.75 टक्के आहे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा 84.84 टक्के जलसाठा होता.

English Summary: Water Shortage Scarcity Less water storage in the state Know the current situation
Published on: 06 September 2023, 05:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)