News

पुणे - यंदा वरुण राजाने थोड्या-थोड्या विश्रांतीने राज्यात पाऊसाची जोरदार फटकेबाजी केली. सर्वत्र पूर स्थिती निर्माण झाली, परंतु इतका कोसळूनही राज्यातील पाणीसाठा कमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated on 18 September, 2021 10:19 AM IST

पुणे - यंदा वरुण राजाने थोड्या-थोड्या विश्रांतीने राज्यात पाऊसाची जोरदार फटकेबाजी केली. सर्वत्र पूर स्थिती निर्माण झाली, परंतु इतका कोसळूनही राज्यातील पाणीसाठा कमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यातील सर्व धरणांमध्ये सध्या सरासरी ८७.२७ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या पुरेसा पाऊस होत असला तरी धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत अद्याप कमी आहे. गतवर्षी सर्व धरणांमध्ये १६ सप्टेंबरअखेर ९२.९६ टक्के इतका पाणीसाठा होता.कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी, राधानगरी, तिल्लारी आणि दूधगंगा ही चारही धरणे जवळपास पूर्ण भरली आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात गतवर्षी ९९.२६ टक्के इतका पाणीसाठा होता, तो यावर्षी ९७.८९ टक्के आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण गतवर्षी पूर्ण भरले होते. परंतु सध्या ७९ टक्के इतका पाणीसाठा आहे.

हेही वाचा : कांदा रोपांच्या दरात घसरण; लागवडीला पावसाअभावी फटका

नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण ९९.६८ टक्के भरले होते. यावर्षी या धरणात सुमारे ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण गतवर्षी जवळपास ९९ टक्के भरले होते. परंतु सध्या या प्रकल्पात ६८.३७ टक्के पाणीसाठा आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

 

विभागनिहाय पाणीसाठा टक्केवारी (गतवर्षीचा पाणीसाठा कंसात)

अमरावती ९३.४७ (९६.७८)

औरंगाबाद ७६.१३ (८९.४०)

कोकण ९४.७८ (९६.११)

नागपूर ७२.९७ (८६.२०)

नाशिक ८१.४३ (९४.०८)

पुणे ८६.८९ (९३.९८)

इतर प्रकल्प ९२.५२ (७८.९६)

शंभर टक्के भरलेली प्रमुख धरणे

पुणे : डिंभे, चासकमान, वडज, गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, पानशेत, वरसगाव, खडकवासला, टेमघर, भामा आसखेड.

सांगली : वारणा.

सातारा : धोम बलकवडी, कन्हेर, वीर.

हिंगोली : येलदरी, सिद्धेश्वर.

नांदेड : निम्न मनार.

English Summary: water in the dams in the state is less than last year
Published on: 18 September 2021, 10:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)