बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज बीड येथे जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या कामकाजाचा समग्र आढावा घेतला. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, स्वामी रामानंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय दवाखान्यातील उपलब्ध औषध साठा तसेच त्या औषध साठ्यात कुठेही कमतरता भासणार नाही, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
आगामी काळातल्या पाणीटंचाई, चारा टंचाई, भूमी अधिग्रहण तसेच जलस्रोतांचे अधिग्रहण, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून हाती घ्यावयाची विशेष कामे, यांबद्दल सविस्तर सूचना केल्या आहेत.
आगामी रब्बी हंगामात पीक कर्जाचे उद्दिष्ट 700 कोटींवरून वाढवून 900 कोटी करण्यात आले आहे. सन 2022 मधील अतिवृष्टीचे व सन 2023 मधील अवकाळी पावसाचे अनुदान वितरण करण्यातील काही त्रुटी दूर करून शक्य तितक्या लवकर उर्वरित शेतकऱ्यांना 100% अनुदान वितरित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवुन देण्यासाठी या कामास विशेष प्राधान्य देऊन पूर्ण केले जावे, असेही निर्देश दिले. जिल्हा रुग्णालयातील 150 बेडचे नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, ते तातडीने पूर्ण केले जावे, यासाठी आवश्यक निधी दिला जाईल.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये मिळतील, अशी नोंदणी करा
पीकविमा अग्रीमची रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर वेळेत मिळावी यादृष्टीने संबंधित सर्व शासकीय विभाग व विमा कंपनीने नियोजन करावे, याबाबतही सूचना केल्या आहेत, तसेच बोगस विमा धारक व त्यांना विमा उतरवून देणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत.
बोगस विमा धारक व त्यांना विमा उतरवून देणारे यांच्यावर कडक कारवाई, कृषी मंत्र्यांचे आदेश..
Published on: 09 October 2023, 12:23 IST