पुणे
जून आणि जुलैमहिन्यात देखील पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे आगामी २०२३-२४ च्या ऊस गाळपावर दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे पाण्याअभावी ऊस पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम ऊस गाळपावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
येत्या साखर हंगामाबाबत संबंधित शिखर संस्थांकडून कारखानदारीची मते जाणून घेतल्यानंतर शासन स्तरावर योग्य ते निर्णय घेतले जातील. तसेच साखरेच्या एमएसपीमध्ये ३ हजार ७२० रुपये वाढ करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वसंतदादा साखर संस्थेत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने शनिवारी (दि.१२) रोजी आयोजित करण्यात आलेला चर्चासत्रात दीपक वळसे पाटील बोलत होते.
यावेळी वळसे पाटील म्हणाले की, "पाण्याअभावी ऊस हंगामावर संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जून-जुलैमध्ये पाऊस झालेला नाही. धरणासाठा देखील कमी असून, पाण्याच्या आवर्तनाचे देखील नियोजन करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सरकार काम करीत असून, साखर हंगामाबाबत नैसर्गिक घडामोडींवर सरकार लक्ष ठेवून आहे."
Published on: 14 August 2023, 10:43 IST