News

गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा महावितरण कट करत आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज भरले नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे.

Updated on 28 February, 2022 11:49 AM IST

गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा महावितरण कट करत आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज भरले नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. राज्यात वीज बील (Electricity bill) या विरोधात आंदोलन सुरु आहेत.

पण आता ऊर्जामंत्री नितीन राऊत आंदोलकांना देण्यात आलेला स्पष्ट इशारा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांचे वीजबिल थकले आहे. या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा (Power supply) खंडित करण्याची मोहीम महावितरण विभागाकडून सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

ऊर्जामंत्री नितीन राऊत हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण ऊर्जामंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. नितीन राऊत म्हणाले की, कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले याची माहिती आम्हांला आहे.

हेही वाचा : मोठी बातमी: साखर कारखाने विकण्याऐवजी भाडेतत्त्वावर देणार

'एफआरपी' थकविणारे 28 साखर कारखाने टाकले लाल यादीत; आयुक्तांची मोठी कारवाई

कोरोना (Corona) काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा करण्यात आला. जर वीज वापरली आहे तर पैसे द्यावेच लागतील. वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

शेतकरी संकटात सापडला

निर्सगाचा लहरीपणा यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहेत. वीज बिलाचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. वीजपुरवठा नाही यामुळे पिकाला पाणी कसे द्यायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

English Summary: Warning to the power minister to cut off power supply to consumers
Published on: 28 February 2022, 11:46 IST