1. बातम्या

महाराष्ट्र राज्यात येत्या ४ दिवसात जोरदार पावसाचा इशारा

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी अजून पावसाला सुरवात सुद्धा नाही.जून जुलै महिन्यात पावसाच्या अभावी लोकांना दुबार पेरणीचे संकट सुद्धा ओढवले होते. परंतु शेतकरी राजा तृप्त होईल असा पाऊस अजिबात झाला न्हवता.जून महिना उजडल्यापासून बऱ्याच ठिकाणी अजिबात पाऊस पडला न्हवता. आणि जेथे झाला तिथे एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होताओमानकडे रवाना झालेल्या ‘शाहीन’ नावाच्या चक्रीवादळाची तीव्रता ही भारतात सध्या कमी झालेली आहे. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातील परिसररात चक्राकार वारे वाहु लागले आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
rain

rain

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी अजून पावसाला सुरवात सुद्धा नाही.जून जुलै महिन्यात  पावसाच्या  अभावी   लोकांना दुबार पेरणीचे संकट सुद्धा ओढवले होते. परंतु शेतकरी राजा तृप्त होईल असा पाऊस अजिबात झाला  नव्हता .जून महिना उजडल्यापासून बऱ्याच ठिकाणी अजिबात पाऊस  पडला नव्हता  आणि जेथे झाला तिथे एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला होताओमानकडे रवाना झालेल्या ‘शाहीन’ नावाच्या चक्रीवादळाची तीव्रता ही भारतात सध्या कमी झालेली आहे. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातील परिसररात चक्राकार वारे वाहु लागले आहेत.

८ ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि महाराष्ट्रात राज्यात इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता:

त्याचसोबत  नैऋत्य  बंगालचा उपसागर व तमिळनाडूच्या  किनाऱ्या  लगत  चक्राकार वाऱ्यांची स्थिती  निर्माण झालेली  आहे. केरळ  व  तमिळनाडू किनारपट्टीपासून  लक्षद्वीपच्या  बेटांपर्यंत वातावरणात हेवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. या कारणामुळे येत्या काही दिवसात म्हणजेच ८ ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि महाराष्ट्रा राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे.काल मराठवाडा विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला त्याचबरोबर पुणे शहरात जोरदार विजेच्या कडकड्याने पाऊस झाला. पुण्यात काल दुपारी ऊन आणि संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी झालेली पाहवण्यास मिळत आहे.

तसेच येत्या 4 दिवसात महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात दुपारी नंतर ढगाळ वातावरण  तयार होऊन तुरळक स्वरूपाचा पाऊस (rain)पडेल असा अंदाज सुद्धा हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यातील कोकण रत्नागिरी पुणे मुंबई विदर्भ मराठवाडा गडचिरोली या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे.

तसेच हवामान खात्याने येत्या 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊसाचे आगमन होईल असा अंदाज सुद्धा व्यक्त केला आहे. त्यामुळे वेळेआधी शेतकऱ्यांनी  आपली  शेतातील  कामे  उरकून घ्यावीत.

English Summary: Warning of heavy rains in Maharashtra in next 4 days Published on: 05 October 2021, 01:09 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters