News

शेतीसाठी पाऊस हा खूप महत्वाचा तसेच गरजेचा आहे. त्यामुळे बळीराजा पाऊसाची आतुरतेने वाट पाहत असतो. गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यात मान्सून ला सुरुवात झाली होती. राज्यातील बऱ्याच ठिकाणी सुरुवातीच्या काळात समाधान कारक पाऊस पडला परंतु काही ठिकाणी अजून सुद्धा समाधान कारक पाऊस पडला न्हवता.

Updated on 01 September, 2022 8:23 PM IST

शेतीसाठी पाऊस हा खूप महत्वाचा तसेच गरजेचा आहे. त्यामुळे बळीराजा पाऊसाची आतुरतेने वाट पाहत असतो. गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यात मान्सून ला सुरुवात झाली होती. राज्यातील बऱ्याच ठिकाणी सुरुवातीच्या काळात समाधान कारक पाऊस पडला परंतु काही ठिकाणी अजून सुद्धा समाधान कारक पाऊस पडला न्हवता.

काही जिल्ह्यात समानधारक पाऊस:

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून जोरदार बरसला यामधे सांगली, मराठवाडा, विदर्भ, कोल्हापूर, मुंबई, पुणे या ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे येथील शेतकरी समाधानी झाला आहे शिवाय पहिल्याच पावसात पुणे जिल्ह्यातील बरीचशी धरणे ही पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रीय काही जिल्ह्यांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये आजसुद्धा उत्तम पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे पिके काढणीला आलेल्या असताना पाऊस अभावी रणातच जळून चालली आहे.

हेही वाचा:अकोला कृषि विद्यापीठात कोविड बूस्टर डोस शिबिर संपन्न! विद्यार्थी कल्याण विभागाचा उपक्रम

तसेच आज पहाटे पश्चिम महाराष्ट्रीय भागात माण तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी उत्तम प्रतीचा पाऊस झाल्यामुळे येथील शेतकरी वर्ग सुखावला आहे. शिवाय याचा फायदा पिकांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार येत्या 24 तासात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. यामधे कोकण, रत्नागरीती, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई या जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवाय पुणे, सिंधुुदूर्ग, रत्नागिरी आणि महाड या ठिकाणी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

असे असून सुद्धा राज्यातील अनेक ठिकाणी पाऊसाचे प्रमाण खूपच कमी आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातारणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. ढगाळ वातवरणामुळे पिकांवर अळी, रोगराई पसरण्याची शक्यता जास्त आहे शिवाय उत्पादनात घट होण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात राज्यात समाधान कारक पाऊस पडेल असे आवाहन सुद्धा केले आहे

English Summary: Warning of heavy rain in the state in the next 24 hours, the Meteorological Department has predicted a red alert for these districts
Published on: 01 September 2022, 11:15 IST