पीएम किसान सन्मान निधीसाठी अपात्र असूनही काहीजण त्याचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळला आहे. दरम्यान, योगी सरकारन पीएम किसानसाठी अपात्र असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करत आहे. योगी सरकारने अपात्र ठरवले असूनही, पीएम किसान सन्मान निधी घेणार्यांना चाप लावण्यासाठी योगी सरकार उपाययोजना करत आहे.
सरकारी कारवाईच्या भीतीने झाशीतील १८५ बनावट आणि अपात्र शेतकऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत मिळालेले पैसे सरकारला परत केले आहेत. झाशी जिल्ह्यातील २ हजार ४८९ शेतकरी अपात्र ठरले असून त्यांना परताव्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यातील लाभार्थ्यांची शासनस्तरावर चौकशी केली असता, २ हजार ४८९ शेतकरी कर भरत असल्याचे दिसून आले. तसेच या योजनेचा लाभ घेत आहेत. या सर्वांना अपात्र ठरवून नोटीस पाठवून पैसे परत करण्यास सांगितले आहे.
नोटीस बजावल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मानधन मिळणे सुरूच असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा कृषी अधिकारी के.के. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जे शेतकरी आयकर अंतर्गत येतात आणि मानधन निधी देखील घेत होते त्यांना नोटीस बजावून रक्कम परत करण्यास सांगितले होते. वसुलीसाठी कृषी विभागाने यादी तयार केली असून आतापर्यंत १८५ अपात्र शेतकऱ्यांकडून १२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी स्वेच्छेने पैसे परत केले नाहीत त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे सिंग म्हणाले.
असे प्रकार भारतातील अनेक राज्यात घडत आहेत. त्यामुळे सरकार आता यावर कारवाई करणार आहे त्यामुळे तुम्ही आयकर भरत असाल तर तुम्ही हा निधी घेण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घ्या नाहीतर शासन नोटीस पाठवू शकते तसेच कारवाई करू शकते.
महत्वाच्या बातम्या
नात्याचा प्रेमळ बंध! बिबट्याचा बछडा आठवडाभर दीड वर्षाच्या 'तन्वी'च्या अंगाखांद्यावर खेळला, वनविभागाच्या ताब्यात देताना सर्वांना अश्रू अनावर
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये होणार 'इतकी' वाढ
Published on: 11 May 2022, 12:07 IST