News

भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, त्यामुळे शेतीशी निगडीत सर्व अवजारे, औषधे, कीटकनाशके व खते शेतकर्‍यांना एकाच छताखाली माफक दरात मिळावीत या उद्देशाने कृषी सेवा केंद्रे सुरू करण्यात आली. तसेच शेती क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना कृषी सेवा केंद्र सुरू करणे ही व्यवसाय कल्पना फायद्याची ठरत आहे. कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केल्यास चांगला नफा मिळवता येतो, त्यासाठी आवश्यक असणारा परवाना मिळवणे अगदी सोपे झाले.

Updated on 02 November, 2023 4:26 PM IST

भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, त्यामुळे शेतीशी निगडीत सर्व अवजारे, औषधे, कीटकनाशके व खते शेतकर्‍यांना एकाच छताखाली माफक दरात मिळावीत या उद्देशाने कृषी सेवा केंद्रे सुरू करण्यात आली. तसेच शेती क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना कृषी सेवा केंद्र सुरू करणे ही व्यवसाय कल्पना फायद्याची ठरत आहे. कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केल्यास चांगला नफा मिळवता येतो, त्यासाठी आवश्यक असणारा परवाना मिळवणे अगदी सोपे झाले.कृषी विभागामार्फत बियाणे,खते,कीटकनाशके विक्रिसाठी परवाना दिला जातो. त्यामुळे कृषी सेवा केंद्र परवाना काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.

किती लागते शुल्क -
कीटकनाशके विक्रीचा परवाना – 7,500 रुपये
बियाणे विक्रीचा परवाना – 1,000 रुपये
रासायनिक खते विक्रीचा परवाना – 450 रुपये

अर्जदाराची पात्रता -
बी टेक
बीएससी
कृषी पदविका 2 वर्ष
बीएससी( ॲग्री)

आवश्यक कागदपत्रे -
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट फोटो
शॉप अॅक्टचं प्रमाणपत्र
शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र
ग्रामपंचायतचे ना-हरकत प्रमाणपत्र
जिथं दुकान टाकायचं आहे त्या जागेचा गाव नमुना-8
दुकानाची जागा मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार

परवाना नूतनीतकरण -
कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचं दर 5 वर्षांनी नूतनीतकरण करावे.

परवाना रद्द होण्याची कारणे -
कृषी सेवा केंद्रातून बेकायदेशीररित्या खते, बियाणे किंवा कीटकनाशकांची विक्री करत असल्याचं समोर आल्यास किंवा परवान्याचं नूतनीतकरण न केल्यास परवाना रद्द होऊ शकतो.

कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागतो. त्यामुळे ‘आपले सरकार’ या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

English Summary: Want to start an agricultural service center? Know the rules
Published on: 02 November 2023, 04:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)