अत्ताच्या युगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेतीकडे वाढलेला आहे कारण पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांना त्या शेतीमधून पाहिजे असे उत्पादन मिळत नाही. एवढेच नाही तर शेती मध्ये लागवडी साठी केलेला खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि आर्थिक अडचणी सुद्धा त्यांना खूप येतात.परंतु आज शेतकरी वर्ग तीच शेती आधुनिक पद्धतीने करत असल्याने अगदी कमी वेळेत आणि कमी कष्ट करून जास्तीत जास्त उत्पन्न काढत आहेत.
परभणी तालुक्यात पाथरी रोड येथील जांब मध्ये भीमराव पवार या नावाचे शेतकरी राहतात जे की पवार यांनी त्यांच्या फक्त अडीच एकर शेती मध्ये "ड्रॅगन फ्रुट" या फळाची लागवड केली आहे. भीमराव पवार हे एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. भीमराव पवार यांनी "ड्रॅगन फ्रुट"(dragon fruit) या फळाची रोपे अहमदनगर, हैदराबाद आणि पुणे इथून विकत आणली आणि त्यांच्या अडीच एकर शेतामध्ये एक हजार ड्रॅगन फ्रुट च्या रोपांची लागवड केली
परभणी तालुक्यात पाथरी रोड येथील जांब मध्ये भीमराव पवार या नावाचे शेतकरी राहतात जे की पवार यांनी त्यांच्या फक्त अडीच एकर शेती मध्ये "ड्रॅगन फ्रुट" या फळाची लागवड केली आहे. भीमराव पवार हे एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. भीमराव पवार यांनी "ड्रॅगन फ्रुट" या फळाची रोपे अहमदनगर, हैदराबाद आणि पुणे इथून विकत आणली आणि त्यांच्या अडीच एकर शेतामध्ये एक हजार ड्रॅगन फ्रुट च्या रोपांची लागवड केली.
सध्या च्या स्थितीत पाहायला गेले तर लाल आणि पांढऱ्या रंगाचे ड्रॅगन फ्रुट उपलब्ध आहे. ड्रॅगन फ्रुट या फळाची विक्री करण्यासाठी अत्ता पवार यांनी ऍडव्हान्स बुकिंग सुद्धा चालू केले आहे.भीमराव पवार यांनी त्यांच्या कार्यमधून दाखवून दिले की जर तुम्ही योग्य नियंत्रण तसेच तंत्रज्ञानाचा वापर केला आणि इच्छा शक्ती चांगल्या प्रकारे असेल तर अगदी कमी शेतीमधून सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन काढू शकता आणि याच सगळ्याचा वापर करून पवार या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या कार्यमधून एक आदर्श निर्माण केला. भीमराव पवार यांनी सांगितले की शेतीला जोड धंदा म्हणून फळबाग लावण्याचा विचार करत असाल तर ड्रॅगन फ्रुट हे फळ चांगलं ठरेल आणि त्यामधून तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता.
Published on: 16 August 2021, 07:20 IST