News

वॉलमार्ट फाउंडेशनने भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी पाच वर्षांत सुमारे १८० कोटी रुपये गुंतवणूकीच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून दोन नवीन अनुदानाची घोषणा केली आहे.

Updated on 17 September, 2020 5:33 PM IST


वॉलमार्ट फाउंडेशनने भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी पाच वर्षांत सुमारे १८० कोटी रुपये  गुंतवणूकीच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून दोन नवीन अनुदानाची घोषणा केली आहे. जवळजवळ ३३ कोटी रुपये शेतकऱ्यांना सुधारित उत्पादन आणि बाजारपेठेतून अधिक पैसे कमविण्यास साहाय्य म्हणून वापरण्यात येतील. तसेच शेतकरी उत्पादक संस्थांमार्फत महिला शेतकरी वर्गासाठी भविष्यात संधी वाढविण्यावर भर देण्यात येईल.

वॉलमार्टने केलेल्या या नवीन अनुदानामुळे भारतातील आठ अशासकीय संस्था (स्वयंसेवी संस्था) यांच्यासमवेत एकूण  ११० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, सुमारे  ८० हजार महिला यात जोडल्या गेल्या आहेत. तसेच एकूण १लाख ४० हजारपेक्षा जास्त शेतकरी वर्ग यात जोडले गेले आहेत.वॉलमार्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि कार्यवाहक उपाध्यक्ष व वॉलमार्ट इंकचे मुख्य अधिकारी कॅथलीन मॅकलॉफलिन म्हणाले की, जागतिक कोविड-१९ साथीच्या रोगाने भारतातील शेतकऱ्यांवर  दबाव वाढला आहे, विशेषत म्हणजे महिला शेतकरी वर्गाच्या घरातील अतिरिक्त जबाबदा वाढलेल्या आहेत. त्यामुळे वॉलमार्ट फाऊंडेशन आणि आमचे भागीदार शेतकऱ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहणार आहे.

फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वॉलमार्ट फाउंडेशन बोर्ड ऑफ डायरेक्टरचे सदस्य कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले की, भारतातील शेतकऱ्यांना उत्पादनक्षमता आणि उत्पादन वाढविण्यात, मौल्यवान बाजारपेठेत माहिती मिळविण्यासाठी आणि अधिक कार्यक्षमतेचा भाग म्हणून यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या उपायांची मोठी शक्यता आहे. शेतकरी उत्पादक संघटना शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी आणि त्यांना डिजिटल युगात आणण्याच्या पायाभूत धोरणाची गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

English Summary: Walmart provide Rs 180 crore subsidy to farmers
Published on: 17 September 2020, 05:32 IST