News

पालघर जिल्ह्यातील वाडा मोखाडा भागातील परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारा वाडा कोलम या जातीच्या तांदळाला जीआय टॅग देण्यात आला आहे.

Updated on 04 October, 2021 9:36 AM IST

 पालघर जिल्ह्यातील वाडा मोखाडा भागातील परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारा वाडा कोलम या जातीच्या तांदळाला जीआय टॅग देण्यात आला आहे.

आता वाडा कोलम तांदळाला जीआय टॅग मिळाल्यानंतर चला विशेष मान्यता प्राप्त होऊन मोठ्या बाजारपेठांमध्ये देखील आताउपलब्ध होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी मुंबईतया संदर्भातली बैठक होऊन वाडा कोलम  तांदळाला जी आय टॅग देण्यात आला.

 हा तांदूळ प्रामुख्याने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात उत्पादित केला जातो. या तांदळाचे दाणे पांढरे शुभ्र रंगाचे असतात. या तांदळाचा बाजार भाव 60 ते 70 रुपये प्रति किलो असा आहे.

 या विशिष्ट प्रकारच्या तांदळाला विदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.वाडा तालुक्यातील जवळजवळ दोन हजार पाचशे शेतकरी या तांदळाच्याजातीच्या भाताची लागवड करतात.

जीआय टॅग चे महत्व

जी आय  टॅगिंग हे उत्पादनाबाबत एखाद्या क्षेत्राला, व्यक्तीच्या गटाला आणि संघटनेला दिले जाते.एखाद्या विशिष्ट प्रकारचे उत्पादन एखाद्या भागातच उत्पादन होत असेल तर त्याला जी आय टॅग दिला जातो. जी आय टॅग चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या उत्पादनाला जीआय टॅग दिला जातो, 

त्या उत्पादनाची किंवा पदार्थाची दुसरे कोणीच कॉपी करू शकत नाही. जी आय टॅग नेसंबंधित उत्पादनाचे भौगोलिक ठिकाण दर्शवले जाते. जिआय टॅगिंग उद्योग संवर्धन,अंतर्गत व्यापार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते.(स्रोत-news18 लोकमत)

English Summary: wada kolam is rice species receive gi tag palghr district
Published on: 04 October 2021, 09:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)