News

केंद्रीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवशी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डिजिटल वोटर आयडी कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करायचे सुविधा सुरू केली आहे.

Updated on 25 March, 2021 7:12 PM IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवशी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डिजिटल वोटर आयडी कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करायचे सुविधा सुरू केली आहे.

भारतातील काही राज्यात जसे की पश्चिम बंगाल, केरळ,आसाम इत्यादी राज्यात हे डिजिटल वोटर आयडी कार्ड वापरता येणार आहे..

हेही वाचा : झेरॉक्सपेक्षा काळा आलेला आधारवरील फोटो बदलायचा का ? जाणून घ्या! सोप्या पद्धती

   डिजिटल वोटर आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे ते पाहू

  • सगळ्यात अगोदर https://voterportal.eci.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्या. भेट दिल्यानंतर जिथे तुमचा अकाउंट बनवा. अकाउंट बनवल्यानंतर लॉगिन करून वेबसाईटवरील e-pic हा पर्याय निवडावा.

  • हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा मतदार क्रमांक टाकावा. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो. ओटीपी आल्यानंतर तो संबंधित वेबसाईटवर नोंदवावा.

  • त्यानंतर तुम्ही तुमचे डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करू शकता.

 

यासाठी केवायसी करणे का असते गरजेचे?

 काही मतदारांचे मोबाईल नंबर हे निवडणूक आयोगाचा रेकॉर्ड मध्ये वेगळे असतातआणि सध्या ते दुसरा कुठला नंबर वापरत असतात. अशावेळी केवायसी प्रक्रिया निवडावी लागते. केवायसी कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करू शकता.

पीडीएफ स्वरूपात मिळेल डिजिटल वोटर कार्ड

 नवीन काही मतदारांनीच नवीन नोंदणी केली असेल तर अशी नोंदणी केलेल्या मतदारांना दोन्ही स्वरूपाचे मतदान कार्ड मिळणार आहे. हे कार्ड आपल्याला आपल्या डीजी लॉकर मध्ये हि सेव्ह करता येऊ शकते. ज्या मतदारांचा मोबाईल क्रमांक हा आयोगाकडे रजिस्टर नाही, अशांना तो निवडणूक आयोगाकडून मोबाईल नंबर पडताळणी करून घ्यावी लागणार आहे.

English Summary: Voters will now get a digital voter ID
Published on: 25 March 2021, 01:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)