News

शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्याचा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांचा इशारा

Updated on 28 March, 2022 9:05 PM IST

शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्याचा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांचा इशारा

चिखली- तालुक्यातील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांकडुन शेतीपीकाचे मोठे नुकसान होत असते तर शेतकऱ्यांनी या सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी ऑनलाइन अर्ज सुद्धा केलेत परंतु हि नुकसानीची मदत प्राप्त झाली नसल्याने शेतकऱ्यांसह स्वाभिमानीने आक्रमक पावित्रा घेतला असुन चिखली तालुक्यातील व गोदरी परीसरातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ खात्यावर जमा करण्यात यावी,अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांसह वनविभागास दिला आहे.

चिखली तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये त्याचप्रमाणे गोदरी शिवारामध्ये राणडुक्कर,हरीण,रोहि,या वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांचे सोयाबीन व इतर पिकाचे मोठे नुकसान केले होते.

नुकसान ‌भरपाई मिळावी यासाठी सोयाबीन पिक नुकसानीचे आॅनलाईन अर्ज देखील शेतकऱ्यांनी सन२०२१-२२मध्ये वनविभागाकडे केले आहे.तेव्हा याचे पंचनामे सुद्धा तलाठी,वनपाल व संबंधीत विभागाचे अधिकारी यांच्याकडुन करण्यात आले आहे.अगोदर नैसर्गीक संकटाने शेतकरी ग्रासलेला आहे.आनी त्यातच वन्यप्राणी शेतात रात्रीचा हैधोस घालीत असुन रब्बी व खरीप हंगामात शेतीपीकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.महिणे उलटुनही वन्यप्राण्यांनी केलेल्या शेती पीक नुकसानीची मदत (अनुदान)

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर प्राप्त झाले नाही.पिक हानी,व प्राणी हल्यामध्ये दगावलेली मनुष्य हाणी,

त्याचप्रमाणे लांडग्यांनी मारलेल्या बकऱ्यांची हाणी याचे जिल्ह्यातील एकुण अंदाजे 42लाख रुपये रक्कम वनविभागाकडे रखडुन पडली आहे.तर दुसरीकडे मात्र इतर तालुक्यात नुकसान भरपाई मिळाली असल्याची ओरड शेतकरी करतांना दिसत आहेत.या महत्वपुर्ण मागण्यांची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असुन तालुक्यातील 

शेतकऱ्यांची पिक हाणी,प्राणी हल्यात दगावलेल्या बकऱ्यांची नुकसानीची रक्कम तातडीने खात्यावर जमा करण्यात यावी,अर्ज सादर करुनही शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास विलंभ का लागला?या संपुर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक,आमोल मोरे,शुभम पाटिल डुकरे,यांच्यासह आदिंनी जिल्हाधिकारी,उप वनसंरक्षक अधिकारी,वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दि२५मार्च रोजी केली आहे.

तर सदर मागण्यांची पुर्तता होवुन शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी विनायक सरनाईक,शुभम पाटिल,विठ्ठल परीहार,गणेश देशमुख,श्रीकृष्ण पाटिल,सखाराम सोरमारे,सुनिल देशमुख,गजानन परीहार,दिलीप मोळवंडे,दिपक महाले,प्रमोद मुळे,पांडुरंग सोळंकी,जगन्नाथ परीहार,यांच्यासह आदि शेतकरी उपस्थीत होते.

वन्यप्राण्यांकडुन पिकाची नासाडी.

सद्या परीस्थीती पाहता शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पेरली आहे.तर अनेक झण भाजीपाला व इतर पीक घेत आहेत.रात्रीचे शेतात रोही,हरीण यांचे कळप बसत असल्याने शेतीपीकाची मोठी नासाडी होत असुन या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

English Summary: Vinayak Sarnaik demands compensation for crop damage caused by wildlife and conservation of wildlife
Published on: 28 March 2022, 09:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)